Physical Relationship : प्रजननाच्या दृष्टीने लैंगिक संबंध अर्थात सेक्स ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तसेच जोडप्यांमधील प्रेम संबध अधिक मजबूत करण्यासाठी देखील लैंगिक संबध महत्वाची भूमिका बजावतात. यातून मिळणारा आनंद नातं अधिक घट्ट करणारा आणि एकमेकांबद्दलची विश्वासार्हता वाढवणारा असतो. यामुळे सेक्स करताना पार्टनर एकमेकांच्या अनेक गोष्टींचे निरीक्षण करत असतात.  Sex करताना पुरुष महिलांनाबाबत अनेक गोष्टी नोटीस करत असतात. याबाबत ते सेक्स झाल्यानंतरही विचार करत राहतात (Physical Relationship ). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्टनरला खूश करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी महिला अनेक गोष्टींचा विचार करत असतात. यामध्ये वैयक्तीक स्वच्छता, नखं अशा अनेक गोष्टी असतात. यामुळे महिला याकडे जास्त लक्ष देतात. मात्र, या व्यतीरीक्त आणखी चार अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या पुरुष सेक्स करताना विचार करत असतात. सेक्स संपल्यानंतरही पुरुष याबाबत विचार करत राहतात.


महिला पार्टनरच्या शारीरिक हालचाली


दोघांच्या सहमतीही लैंगीत संबध प्रस्थापित होत असतात. यामुळे पार्टनर कशा प्रकारे प्रतिसाद देत याकडे पुरुषांचे विशेष लक्ष असते. महिला पार्टनरच्या शारीरिक हालचालींचे पुरुष अत्यंत बारकाईने निरीक्षण करत असतात. यामुळे महिलांनी शारिरीक हालचाली करताना आपण कशा प्रकारे वागतोय याकडे लक्ष देण तितकचं गरजेचे आहे. 


डोळे


शब्दात न मांडता येणाऱ्या भावना नजरेतून व्यक्त करता येतात. यामुळे सेक्स करताना पुरुष महिला पार्टनरच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर जास्त लक्ष ठेवातात. सगळे भाव नजरेतून व्यक्त होतात. यामुळे पुरुष सेक्स करताना महिलांच्या डोळ्यात पाहून त्यांच्या भावना जाणून घेण्याच्या प्रयत्न करतात. 


आवाज आणि श्वासोश्वास


एकातांत पार्टनर एकमेकांच्या अगदी जवळ असतात. यामुळे बऱ्याचदा पुरुष आपल्या पार्टनरचे हार्टबीट जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.  तसेच बोलताना आवाज कशा प्रकारचा आहे. आवाजातील चढ उताराचे देखील पुरुष निरीक्षण करत असतात. यावरुन पुरुष हे महिला पार्टनर काय फिल करत आहे याचा अंदाज घेतात. 


लॉन्जरी


लॉन्जरी अर्थात अंडरगार्मेंट्स.... महिलांच्या लॉन्जरीकडे पुरुषांचे विशेष लक्ष असते. यामुळे लैंगिक संबधापूर्वी रोमॅन्टिक वातावरण निर्माण करण्यासाठी महिलांनी आपल्या पार्टनरला आवडतील अशी लॉन्जरी निवडावी. लॉन्जरी या पार्टनरला विशेष आकर्षित करत असतात. यामुळे पुरुष महिला पार्टनने परिधान केलेल्या लॉन्जरीबाबत अनेककाळ विचार करत राहतात.