मुंबई : सध्याच्या युगात लग्न तुटण्याचे प्रमाण वाढलेय. यामागे अनेकदा पुरुष अथवा महिलेचे विवाहबाह्य संबंध कारणीभूत असतात. लग्नानंतर विवाहबाह्य संबंध असण्याची काय कारणे असतात घ्या जाणून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक संशोधानामधून असे समोर आलेय की साधारण ८० टक्के पुरुष हे पत्नींना सेक्शुअस इच्छांच्या कारणांनी धोका देतात. आपल्या नात्यात असंतुष्ट असल्याने नव्या नात्याबद्दल विचार करतात. 


नात्यात एकमेकांसाठी वेळ देणे तितकेच गरजेचे असते. तो मिळत नसेल तर नात्यात दुरावा येण्याची शक्यता असते. यावेळी विवाहबाह्य संबंध निर्माण होऊ शकतात.


अनेकदा विवाहबाह्य संबंध हे केवळ शारिरीक आकर्षणापुरते मर्यादित असते. मात्र असे असेल तर प्रत्येकाने याबाबत आपल्या पार्टनरचा जरुर विचार करावा.


तुमचे तुमच्या पार्टनरशी किती जुळते. यावरही तुमचे नाते अवलंबून असते. तुम्हाला एकमेकांबाबत असुरक्षित वाटत असेल तर योग्य वेळी नात्याचा विचार व्हायला हवा.