जोडीदाराचा कंटाळा, शारीरिक गरजा आणि...; `या` कारणाने लोकं ठेवतात Extra Marital Affair, अहवालातून धक्कादायक खुलासा
Extra Marital Affair : ग्लिडन हे एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप ( extra marital dating app ) असून जगभरात जवळपास 10 मिलियन लोकं या अॅपचा वापर करतात. या अॅपच्या सर्व्हेमधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
Extra Marital Affair : सध्या ग्लिडन हे अॅप ( Gleeden ) फार चर्चेत आहे. या एपनुसार, भारतात 20 लाखांहून अधिक लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात. ग्लिडन हे एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप ( extra marital dating app ) असून जगभरात जवळपास 10 मिलियन लोकं या अॅपचा वापर करतात. नुकतंच या डेटिंगच्या दाव्यानुसार, त्यांच्या अॅपवरील 20 टक्के लोक भारतीय आहेत. यामध्ये जे विवाहित आहेत आणि नवीन जोडीदाराच्या शोधात आहेत त्या व्यक्ती या अॅपचा वापर करतात.
ग्लिडन अॅपच्या एका रिपोर्टनुसार, कोविड नंतर हे अॅप वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अॅपचे युजर 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष त्याचे असल्याचं समोर आलंय. तर महिलांचे सरासरी वय 26 वर्षे आहे.
देशात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवण्याकडे लोकांचा कल का जास्त हे ग्लिडन अॅपने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या अॅपच्या सर्व्हेमधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
एक्ट्रा मॅरेटरियल अफेअर ठेवण्यामागे लोकांनी दिलेली कारणं-
63 टक्के लोकांनी सांगितलं की, ते त्यांच्या जोडीदाराला कंटाळलेत असून त्यांच्या सहवासात त्यांना बोर होतं
20 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, विवाहबाह्य संबंध ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. म्हणून त्यांना देखील यासाठी प्रयत्न केला.
10 टक्के लोकांनी त्यांच्या जोडीदाराशी भांडण झाल्यानंतर फसवणूक झाली.
8 टक्के लोकांच्या सांगण्यानुसार, ते त्यांच्या जोडीदाराशिवाय दुसऱ्याच्या प्रेमात पडले आहेत.
याशिवाय ही कारण देखील एक्ट्रा मॅरेटरियल अफेअरला कारणीभूत ठरतात.
कम्युनिकेशन गॅप
आजकाल पती-पत्नी दोघंही बिझी असल्याने त्यांना एकमेकांशी बोलायला वेळच मिळत नाही. संवाद हा तुम्हाला कनेक्ट ठेवतो. त्यामुळे काही गोष्टी या बोलण्यातूल सहज सोडवता येतात.
इगो
जोडप्यांमध्ये परस्पर संबंधापेक्षा अहंकार मोठा झाला आहे. यावेळी कपल्स एकमेकांच्या छोट्या-छोट्या चुका लक्षात आणून देतात. सार्वजनिक ठिकाणीही ते स्वतःला इतरांपेक्षा सक्षम आणि हुशार दाखवण्यासाठी वाद घालतात.
शारीरिक गरजा
आजकाल जोडपी आयुष्य स्वतःच्या अटीवर जगण्यास प्राधान्य देतात. या विचारामुळे त्यांना वैयक्तिक जागेची गरज आहे, ते खूप कमी वेळ एकत्र घालवतात. अशा परिस्थितीत ते लोक शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी इतर पर्याय शोधतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सर्व्हेवरील माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)