मुंबई : प्रेम ही एक सुंदर भावना आहे. ही भावना प्रत्येकाला सुखावून जाणारी असते. आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय ही भावनाच सुखावून जाणारी असते. प्रेम ही नकळत घडणारी गोष्ट आहे. प्रेम कधी होईल काही सांगू शकत नाही. प्रेमात पडल्यानंतर सर्वच काही छान छान वाटू लागते. जीवन प्रेमाच्या लहरीवर तरंगू लागते. हे सगळं जणू काही स्वप्नवत वाटू लागते. मात्र स्वप्न आणि हकिकत यात फरक असतो. सगळ्यांचेच प्रेम यशस्वी होते असे नाही. काहींना पहिल्या प्रेमात यश येत नाही. त्यामुळे प्रेमात ब्रेकअप झाल्यावर दुसऱ्यांदा आपण प्रेमात पडायचेच नाही असे काहीजण ठरवतात. मात्र असे ठरवून कधी काही होत नसते. जगात कोणती ना कोणती व्यक्ती असतेच जिच्या तुम्ही पुन्हा प्रेमात पडता. दुसऱ्यांदा प्रेमात पडत असाल तर या गोष्टींची जरुर काळजी घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. जे घडले ते जुने झाले. एखाद्याच्या आठवणीत स्वत:ला त्रास करुन घेण्यापेक्षा पुढे निघून गेलेले बरे. त्यामुळे जुन्या गोष्टी विसरुन जीवनात पुढे जा. तसेच नव्या जोडीदारासोबत कधीही जुन्या गोष्टी काढू नका. फोटोज, व्हिडीओ, चॅट्स डिलीट करुन टाका. 


२. दुसऱ्यांदा नात्यात पडण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक पार्टनर निवडा. जर तुम्हाला एकांत आवडत असेल तर असा पार्टनर निवडा जो तुमची स्पेस जपेल. कारण सुरुवातीला प्रेमात सगळं काही छान असतं मात्र जसजशी वेळ पुढे सरकेल तसतसे मूळ स्वभाव समजेल. 


३. प्रेमात अॅटॅचमेंट महत्त्वाची मात्र इतकीही नको की ज्यामुळे रिलेशनशिप टॉक्सिक होईल. यासाठी पार्टनर डोईजड होणारा नसावा तसेच २४ तास फक्त हुकूम सोडणारा नसावा. 


४. जीवनात तडजोड ही करावीच लागते मात्र असेही नको की नेहमी तुम्हीच तडजोड कराल. तुमच्या पार्टनरनेही तुम्हाला तितकेच समजून घेतले पाहिजे. तरच तुमचे जीवन सुखकर होऊ शकते.