हात पकडण्याच्या पद्धतीवरुन जाणून घ्या तुमचे रिेलेशनशिपबद्दल बरंच काही...
प्रेम ही सुंदर कल्पना आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा त्यांना आपले जीवनही तितकेच सुंदर वाटू लागले. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागतो.
मुंबई : प्रेम ही सुंदर कल्पना आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा त्यांना आपले जीवनही तितकेच सुंदर वाटू लागले. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागतो.
दोन व्यक्तींचे नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी एकमेकांना पुरेसा वेळ देणंही तितकंच गरजेचं असतं. जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त करणे गरजेचे असते. हे प्रेम व्यक्त करण्याची अनेकांची पद्धत वेगवेगळी असते. तुमच्या पार्टनर सोबत चित्रपट बघण्यास अथवा शॉपिंग करण्यास गेला तर जोडीदाराचा हात हातात घेवून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करु शकता. यामुळे तुमच्या जोडीदारावर तुम्ही किती जिवापाड प्रेम करता हे दिसून येते. जाणून घ्या
१. डाऊन फेसिंग पाम
याप्रकारे हात पकडणारे जोडपे एकमेकांप्रती प्रेमाचे प्रत्येक क्षण तसेच प्रत्येक गोष्ट शेअर करतात. तसेच एकमेकांची तितकीच काळजी घेतात.
२. इंटरलॉक फिंगर
या पद्धतीने हात पकडणे म्हणजे रिलेशनशिपमध्ये सुरक्षित असल्याची भावना. तसेच दोघांमध्ये चांगले बाँडिंग आणि एकमेकांची साथ कधीही सोडणार नसल्याचे लक्षण असते.
३. फन फिंगर होल्ड
या प्रकारे हात पकडणारे जोडपे एकमेकांच्या प्रायव्हसीचा आदर करतात. तसेच दोघेही एकमेकांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा आणि स्पेस देण्यावर विश्वास ठेवतात.
४. पुलिंग हँड
जेव्हा एखादे जोडपे या पद्धतीने हात पकडतात तेव्हा त्यांच्या प्रेम कमी असल्याचे दिसते. आपल्या जोडीदारांमध्ये एकमत नसते.