मुंबई : आताही आपल्याकडे शारीरिक संबंधांबाबत (Physical Realtion) उघडपणे बोलणं टाळलं जातं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की अजुनही तारूण्यात आलेल्या मुला-मुलींना माहित नसतात त्यामुळे सेक्स एज्युकेशनही तितकंच महत्त्वाचं आहे. महिला लग्न झाल्यावर काही गोष्टी अशा असतात ज्या पत्नी पतीला सांगणं टाळतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंथरुणावर पतीनं कसं वागावं
कधीकधी, स्त्रियांना त्यांचे पती अंथरुणावर कसे वागतात हे आवडत नाही. गोंधळ किंवा समस्या निर्माण होऊ नये म्हणून ते त्यांच्या इच्छा गुप्त ठेवतात. काही स्त्रियांना धुसमुसळे पणा अजिबात आवड नाही. अकाली उत्सर्ग किंवा इरेक्टाइल डिसफंक्शन( नपुंसकता ) यांसारख्या अंथरुणावर लैंगिक कार्य करू शकत नाहीत तेव्हा पुरुष देखील खूपच असुरक्षित होतात.


स्त्रियांची कामोत्तेजना पूर्ण होत नाही
बर्‍याचदा स्त्रियांची कामोत्तेजना पूर्ण होत नाही. पुरुषांच्या तुलनेत महिलांना क्लायमॅक्स होण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यांना फोरप्ले, बरेच चुंबन घेणे, मिठीत घेणं तितकच आवश्यक आहे. ज्याबद्दल बहुतेक पुरुषांना माहिती नसते. बहुतेक स्त्रिया त्यांच्या पतींना याबद्दल सांगत नाहीत की त्यांना कुठे कुरवाळल्यावर बरं वाटतं.  हे आपल्या पतीला सांगत नाही कारण त्यांना वाईट वाटू नये.


कसा सेक्स आवडतो हे सांगायला घाबरतात
काही स्त्रियांची लैंगिक इच्छा खूप जास्त असते जी त्यांच्या पतींना कळत नाही. महिला त्यांना किती सेक्स आवडतो आणि कसा सेक्स आवडतो हे पतीला सांगत नाही, हे सांगण्याची त्यांना भिती वाटते. जर सांगितलं तर पती त्यांच्या बद्दल वेगळाच अर्थ लावतील या भितीनं त्यांना त्यांच्या लैंगिक इच्छा गुप्त ठेवायला आवडतात.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)