Todays Panchang : आठवड्याच्या शेवटी शुभकार्य करताय? योग्य वेळ, मुहूर्त पाहा म्हणजे पश्चाताप नको...
Todays Panchang : आजच्या दिवसातील महत्त्वाचे मुहूर्त, वेळा, तिथी आणि योग या साऱ्याची माहिती तुम्हाला पंचांगाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं एखादं शुभकार्य करण्याआधी यावर नजर घालाच.
Todays Panchang : अनेक नोकरदारांसाठी आजचा दिवस आनंदाचा. कारण, आज नोकरीच्या ठिकाणी अनेकांसाठीच आठवड्याचा शेवट. म्हणजे दोन सुट्ट्यांची चाहूल आणि आपल्या माणसांसोबत वेळ घालवण्याची सुवर्णसंधी. आठवड्याच्या या सुट्टीला तुम्ही काही बेत आखले आहात का? महत्त्वाच्या कामांसोबतच काही विधीकार्य उरकण्याचा तुमचा मानस आहे का? लगेच पाहा आजचं पंचांग. यामधून तुम्हाला शुभ मुहूर्त, अशुभ काळ, चंद्रोदय, सूर्योदय, योग, तिथी या साऱ्याची माहिती मिळणार आहे.
अनेकदा आपण उत्साहाच्या भरात सोयीनं एखाद्या कामासाठी एखादा दिवस निवडतो. पण, अशा वेळी मुहूर्त आणि त्या दिवसाच्या लाभदायक वेळा पाहणं मात्र राहून जातं. त्यामुळं किमान पश्चाताप नको, यासाठी तरी तुम्ही पाहून घ्या आजचं पंचांग.... (10 march 2023 friday todays panchang mahurat latest astro news in marathi )
आजचा वार - शुक्रवार
तिथी- तृतीया
नक्षत्र - चित्रा
योग - वृद्वि
करण- वाणिज, विष्टि
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:37 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.26 वाजता
चंद्रोदय - सायंकाळी 09.04 वाजता
चंद्रास्त - सकाळी 08:07 वाजता
चंद्र रास- कन्या
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त– 08:59:03 पासुन 09:46:19 पर्यंत, 12:55:25 पासुन 13:42:41 पर्यंत
कुलिक– 08:59:03 पासुन 09:46:19 पर्यंत
कंटक– 13:42:41 पासुन 14:29:57 पर्यंत
राहु काळ– 11:03:08 पासुन 12:31:47 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 15:17:14 पासुन 16:04:30 पर्यंत
हेसुद्धा वाचा : Horoscope 10 March 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीमध्ये हलगर्जीपणा करू नये!
यमघण्ट–16:51:47 पासुन 17:39:03 पर्यंत
यमगण्ड– 15:29:03 पासुन 16:57:41 पर्यंत
गुलिक काळ– 08:05:52 पासुन 09:34:30 पर्यंत
शुभ काळ
अभिजीत मुहूर्त - 12:08:08 पासुन 12:55:25 पर्यंत
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त
चंद्रबल- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)