घरात वातावरण शुद्ध आणि सकारात्मक उर्जा नांदावी म्हणून हे शून्य खर्चाचे उपाय
ज्योतिषशास्त्रात काही गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे, त्यानुसार घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक उर्जेने भरलेलं असावं म्हणून काही गोष्टी करणे आवश्यक आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात काही गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे, त्यानुसार घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक उर्जेने भरलेलं असावं म्हणून काही गोष्टी करणे आवश्यक आहे. या अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत, यासाठी कोणताही आर्थिक खर्च वाढणार नाही. मानलं तर सर्व आहे.
१) प्रथम घरातील अडगळ दूर करावी.
२) घर आठवड्यातून एकदा तरी पाण्यात कापराच्या तेलाचे दोन तीन थेंब टाकून पुसून घ्यावे, नाही तर खड्याचे मीठ पाण्यात टाकून पुसून घ्यावे.
३) भीमसेनी कपूर घरात जाळावा.
४) पती-पत्नीमध्ये वाद होत असतील, तर बेडरूम मध्ये मेरेडियन डकचे शिल्प ठेवावे.
५) घराच्या प्रवेश द्वारावर कोणतेही स्टिकर चित्र चिकटवू नये, प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ फडक्याने पूसून घ्यावे.
६) प्रदेश द्वार बंद उघड करतांना कर कर आवाज होत असेल, तर त्यात तेल टाकावे, ह्या आवाजामुळे घरातील वातावरण बिघडते, आर्थिक अडचणी येतात.
७) घरातील झाडू इथे तिथे टाकू नये, तो सहज कोणाला दिसू नये, अशा ठिकाणी ठेवावा, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तिची सुद्धा पूजा करतो, ती आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकत असते.
८) प्रामुख्याने घरातील सकाळची पूजा घरातील पुरुषांनी करावी आणि संध्याकाळची पूजा स्त्रियांनी करावी , संध्याकाळची वेळ घरात लक्ष्मी आगमनाची असते, तेव्हा तिचे हळदी कुंकू लावून स्वागत करायला स्त्रीच हवी ना.
९) घरात कधी ही नकारात्मक बोलणी करू नये, आपली कर्ज, आजारपण, यांची सतत बोलणी करू नये , इतरांची निंदा नालस्ती करू नये, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.
१०) कुलदैवतेची नित्य पूजा आणि नामस्मरण घरात केल्यास सर्व अरिष्टे निवारण होतात.