Todays Panchang : आज चैत्रातील रवी प्रदोष , जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाल पंचांगानुसार
Todays Panchang : रविवार असल्याने अनेक जण सुट्टीच्या निमित्ताने शुभ कार्य करण्याचा विचार करतात. सत्यनारायणाची पूजा असतो किंवा मालमत्ता खरेदी अथवा एखादी नवीन वस्तू घेणं असो. ज्योतिषशास्त्रात शुभ मुहूर्तावर केलेले कामं हे फलदायी ठरतात. म्हणून जाणून घ्या रविवारचे संपूर्ण पंचांग एका क्लिकवर...
Todays Panchang : आज रविवार...सुट्टीचा दिवस...त्यामुळे अनेक जण आज महत्त्वाची काम करण्याचा विचार करतात. त्यातच आज चैत्र प्रदोष व्रत (Pradosh Vrat 2023). दोष, रोग आणि दु:ख दूर करण्यासाठी रवी प्रदोष व्रत केलं जातं. शिवाय आज रात्री 8 ते 7 पर्यंत सिद्ध योग असणार आहे. तर चंद्र मकर (Grah Gochar) राशीत संक्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांचा मंगळ भारी (Manglik Dosh) असेल त्यांनी आजच्या दिवशी पूजा केल्यास त्यांना लाभ होईल, असं सांगण्यात आलं आहे. अशा या शुभ दिनी तुम्ही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या रविवारचे संपूर्ण पंचांग...(19 march 2023 todays panchang sunday Chaitra Pradosh Vrat 2023 mahurat vrat astro news in marathi)
आजचे पंचांग!
आजचा वार - रविवार
तिथी- द्वादशी
नक्षत्र - धनिष्ठा
योग - सिद्ध
करण- तैतिल गारा
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय (Sun Rise): सकाळी 06:28:09 वाजता
सूर्यास्त (Sun Set): संध्याकाळी 18:31:00 वाजता
चंद्रोदय (Moon Rise): 19 मार्च सकाळी 4:57 वाजता
चंद्रास्त (Moon Set): पहाटे 2:58 वाजेपर्यंत
चंद्र रास(Moon Sign): मकर
ऋतु (Season): वसंत
शुभ वेळ
सिद्ध योग - आज रात्री 7 ते 8
द्विपुष्कर योग - आज सकाळी 8:07 वा
धनिष्ठा नक्षत्र - आज रात्री 10.4 मिनिटांनी
विजय मुहूर्त - दुपारी 02:31 ते 03:36 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत - 12:04 − 12:52 पर्यंत
आजचे अशुभ मुहूर्त
राहुकाल - सकाळी 09 ते 10.30 पर्यंत
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, मघा, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूल, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, उत्तराभाद्रपद
चंद्रबल - मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन
सूर्यदेवाची उपासना (Surya Puja)
रविवार सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी उपाय (Ravivar Ke Upay) आणि विशेष पूजा (Sunday Upay) केल्याने सूर्याशी संबंधित दोष दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.
आजचा मंत्र (Mantra in marathi)
ॐ घृणिं सूर्य्य: आदित्य: ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)