December 2023 Rajyoga : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस उरले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्षाला निरोप देता काही लोकांच्या नशिब चमकणार आहे. या वर्षातील शेवटचा महिना डिसेंबरमध्ये ग्रहांच्या गोचरमुळे एक नाही दोन नाही तब्बल चार राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार आहे. डिसेंबर महिन्यात मंगळ, शनी, शुक्र आणि गुरू - चंद्र यांच्या संयोगाने राजयोग तयार होणार आहे. मंगळामुळे एक राजयोग, शनिमुळे षष्ठ राजयोग, शुक्रमुळे मालव्य राजयोग आणि गुरु चंद्रामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. या चार राजयोगामुळे कोणत्या राशींना धनलाभ होणार आहे. जाणून घ्या यात तुमची रास आहे का? (4 Rajyoga in December in the last month of the year 2023 these zodiac sign lot for money)


मेष रास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसेंबर महिन्यातील चार राजयोग या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात या राजयोगामुळे यशाचे मार्ग उघड होणार आहे. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. ते यशाचे शिखर गाठणार आहेत. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. कानावर मुलांकडून आनंदी बातमी पडणार आहे. या राशीच्या स्वामी मंगळ असल्याने मालमत्ता खरेदीचे योग तुमच्या कुंडलीत जुळून आले आहेत. 


तूळ रास


डिसेंबर महिन्यातील चार राजयोग या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. त्यांच्या कष्टाला यश मिळणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळं आता होणार आहे. नोकरदार लोकांच्या कार्य क्षेत्रात वरिष्ठांकडून कौतुक आणि सन्मान होणार आहे.तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी करणार आहात. तसंच या महिन्यात शुक्राच्या प्रभावामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व चमकणार आहे. 


 


धनु रास


डिसेंबर महिन्यातील चार राजयोग या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या राजयोगांमुळे या राशीच्या लोकांना पैसाच पैसा मिळणार आहे. त्यामुळे यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला लाभणार आहे. व्यापारी वर्गाला नफा मिळणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होणार आहे. तर वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहेत. डिसेंबर महिन्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)