Mahashivratri 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार मार्च 2024 हा महिना अतिशय खास आहे. या महिन्यात अनेक सण, उत्सव आहेत. त्यात 8 मार्च हा दिवश विशेष आहे. कारण यादिवशी महिला दिनासोबत महाशिवरात्रीचा उत्साह आहे. पण त्यासोबतच यादिवशी अजून दोन व्रत असणार आहे. त्यामुळे एका 8 मार्च 2024 ला एका व्रताने तीन व्रतांचं पुण्य मिळणार आहे. महाशिवरात्री ही महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा होता. या दिवशी दोन व्रतांचा योगायोग आहे. ज्यामुळे धन, समृद्धी आणि मोक्षाचे वरदान मिळणार आहे. यादिवशी अजून कुठलं व्रत आहे जाणून घेऊयात. (8 March 2024 is a very special day women day Mahashivratri panchak shukra pradosh vrat lakshmi devi shukravar vrat in marathi)


8 मार्च 2024 ला कोणते व्रत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाशिवरात्री शिवाय 8 मार्च 2024 ला शुक्र प्रदोष व्रत आणि शुक्रवार व्रत असणार आहे. एकाच दिवशी अनेक शुभ योग जुळून आल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला गेला आहे. शिवरात्री आणि प्रदोष हे शिवाला अतिशय प्रिय असून लक्ष्मी-संतोषी मातेचा आशीर्वाद मिळावा म्हणून शुक्रवारी व्रत यादिवशी ठेवण्यात येणार आहे. या तीन व्रतांमुळे जाचकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, अशी मान्यता आहे. 


महाशिवरात्री 2024


महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथ शिवलिंगात वास्तव्य करतात, अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान महादेव शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते अशी आख्यायिका आहे. शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाच्या स्मरणार्थ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी शिव-पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक सुख, उत्तम जीवनसाथी आणि मोक्ष प्राप्त होते अशी मान्यता आहे. 


निशिता काल मुहूर्त - 12.07 am - 12.55 am (9 मार्च 2024)


रात्री प्रथम प्रहार पूजा वेळ - 06:25 PM - 09:28 PM


रात्रीची दुसरी प्रहार पूजा वेळ - रात्री 09:28 - 9 मार्च, 12.31 am


रात्री तृतीया प्रहार पूजा वेळ – 12.31 am – 03.34 am


रात्री चतुर्थ प्रहार पूजा वेळ - 03.34 am - 06:37 am


फास्ट ब्रेकिंग वेळ - सकाळी 06.37 ते दुपारी 03.28 (9 मार्च 2024)


शुक्र प्रदोष व्रत 2024


मार्च महिन्याच्या कृष्ण पक्षाचा प्रदोष आणि माघ महिन्याचा प्रदोष व्रत हे 8 मार्च 2024 ला आहे. प्रदोष व्रत हे शुक्रवार आल्यामुळे त्याला शुक्र प्रदोष व्रत म्हटलं जातं. प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी प्रदोष काळात भोलेनाथ कैलास पर्वतावर आनंदाने नाचतात, शिवपुराण्यात सांगण्यात आलंय. या वेळी शिवाची पूजा केल्याने साधकाच्या सर्व अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे. 


माघ कृष्ण त्रयोदशी तिथी प्रारंभ - 8 मार्च 2024, सकाळी 01.19


माघ कृष्ण त्रयोदशी तिथी समाप्त - 8 मार्च 2024, रात्री 09.57 वा.


पूजा मुहूर्त - 06.25 pm - 08.52 pm


शुक्रवारी वैभव लक्ष्मी आणि संतोष व्रत 


प्रदोष व्रत आणि महाशिवरात्री व्रतासोबतच या दिवशी शुक्रवारच व्रत आहे. शुक्रवारी वैभव लक्ष्मी आणि संतोषी मातेचे व्रत करण्यात येते. यावेळी शुक्रवारी शिवयोग, सर्वार्थ सिद्धी योग, सिद्धी योग यांसह अनेक दुर्मिळ योग निर्माण होणार आहे. 


पूजा मुहूर्त - सकाळी 08.07 - सकाळी 11.04


चोर पंचक 2024


8 मार्चपासून चोर पंचकही सुरु होणार आहे. त्यामुळे अशा स्थितीत या दिवशी पूजा करता येते मात्र कुठलंही शुभ कार्य करता येत नाही. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)