अंकशास्त्रानुसार 4, 13, 22, 31 जन्मतारखेच्या लोकांनी होळीच्या दिवशी `या` अवयवाची काळजी घ्यावी!
Holi NumerologyTips in Marathi : अंकशास्त्रानुसार 4, 13, 22, 31 या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या मूलांक हा 4 असतो. क्रमांक 4 हा राहूशी निगडीत असल्याने या लोकांनी होळीच्या दिवशी एक काम नक्की करायला पाहिजे असा सल्ला अंकशास्त्र तज्ज्ञ यांनी दिला आहे.
Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळीचा उत्साह हा आपल्या आयुष्यात सुंदर आणि सकारात्मक परिणाम करण्यासाठी अंकशास्त्रानुसार जन्मतारखेनुसार प्रत्येक मूलांकसाठी होळीचा उत्साह एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी टीप्स दिल्या आहेत. अंकशास्त्रात जर तुमच्या मूलांकानुसार उपाय केल्यास होळी ही तुमच्या आयुष्यात सप्तरंगी आनंद घेऊन येईल. होळीचा हा उत्साह साजरा करताना योग्य रंगाचे कपडे, सकारात्मक ठरणारे रंग वापऱ्यास तुमचं आयुष्य समृद्ध होऊ शकतं. अंकशास्त्रानुसार 4, 13, 22, 31 या तारखेला ज्यांचा वाढदिवस आहे त्या लोकांचा मूलांक हा 4 असतो. (According to Numerology people born on 4 13 22 31 should take care of this organ on Holi 2024)
4 मूलांक असलेल्या लोकांनी कुठल्या रंगांनी होळी खेळावी?
अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म हा 4, 13, 22, 31 या तारखेला झाला असेल त्यांना राहू ग्रह तुमचा कारक असतो. या जन्मतारखेची लोक खूप जास्त खुले विचार आणि मोठ्या हृदयाचे असतात.
हेसुद्धा वाचा - होळीच्या दिवशी भाग्य उजळण्यासाठी 1, 10, 19, 28 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?
त्यामुळे या लोकांनी होळीच्या दिवशी तुमच्या खोलीला आणि तुमच्या वस्तूंना नीटनीटकं ठेवा. सगळ्या गोष्टी जागच्या जागी आणि नीटनीटकी ठेवणे ही सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे. कारण तुम्ही खूप चांगले नियोजक असतात. त्यामुळे तुम्ही जितक्या जास्त आणि नीट नियोजनबद्ध राहाल तेवढं तुम्ही चौकटीच्या बाहेर जाऊन विचार कराल. त्यामुळे तुमचं आयुष्य सुंदर आणि आनंदीदायी होईल.
हेसुद्धा वाचा - होळीच्या दिवशी नशीब चमकविण्यासाठी 2, 11, 20, 29 जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं?
होळीच्या दिवशी तुम्ही पांढरा किंवा ग्रे रंगाचे कपडे परिधान करा. सकाळी उठल्यावर श्रीगणेशाची पूजा आवश्य करा आणि त्यानंतर होळीचा उत्साह साजरा करा.
हेसुद्धा वाचा - होळीच्या दिवशी 3, 12, 21, 30 जन्मतारखेच्या लोकांनी 'या' रंगाचे कपडे घालू नयेत!
तुम्ही होळीचा आनंद हा सप्तरंगाने करुन शकता. तुम्हाला कुठल्याही रंगाच बंधन नाही. मात्र यांनी लोकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी. या लोकांनी होळीच्या दिवशी काळ्या रंगाचा गॉगल वापरण्याचा सल्ला कविता यांनी दिला आहे. यामुळे तुमचा राहूदेखील आनंदी राहील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)