Aditya Mandal Daan : हिंदू धर्मात दान धर्माला विशेष महत्त्व आहे. शुभ कार्य आमि सनातन धर्मात दान केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार विशेष दिवशी दान केल्यास विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. कुंडलीतील घरांमधील ग्रहांचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होतो. सर्व ग्रहांमध्ये सूर्य हा सर्वाधिक महत्त्वाचा आणि प्रभावशाली ग्रह मानला जातो. (Aditya Mandal Daan Benefits)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील सूर्य हा शक्तीशाली असेल तर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश मोठ्या प्रमाणात असतं. सूर्यदेव बलवान म्हणजे तुमच्या आयुष्यात राजयोग आहे हे नक्की. (aditya mandal daan get surya dev blessings of rajyoga make you rich)


तुम्हाला पण वाटतं तुमच्या आयुष्यात राजयोग असावा तर एका विशेष दान केल्याने तुम्हाला सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळू शकतो. जाणून घेऊयात या विशेष दानाबद्दल.


आदित्य मंडळ दान 


हिंदू धर्मात अनेक प्रकारचे दान आहेत, त्यातील आदित्य मंडल दान हे खूप खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आदित्य मंडल दान केल्याने सूर्याचा आशीवार्द मिळतो अशी मान्यता आहे. तुमच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतात अशी मान्यता आहे. अगदी आदित्य मंडल दान केल्याने तुम्हाला राजयोग प्राप्त होतं असे मानले जाते. 


हेसुद्धा वाचा - Gajkesari Yog : चंद्राच्या संक्रमणामुळे लवकरच गजकेसरी योग; राहू-केतूच्या संयोगामुळे 'या' राशींना आर्थिक फटका?


आदित्य मंडळ दान कसं करावे?


पौराणिक कथेनुसार द्वापार युगात श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला आदित्य मंडळाच्या दानाबद्दल सगळ्यात पहिले सांगितले होते. हे दान कसे करायचे याबद्दल जाणून घेऊयात. तर आदित्य मंडळाचा दान करण्यासाठी गूळ आणि गाईचे तूप मिसळून आदित्य मंडळाच्या आकाराचा पुआ बनवा. त्यानंतर सूर्यदेवाची पूजा करुन लाल चंदनाचा मंडप बनवून त्यात पुआ ठेवा. 


हेसुद्धा वाचा - Shukra Gochar 2023: निर्जला एकादशीपासून 'या' राशींचे भाग्य चमकणार; 6 जुलैपर्यंत जगणार राजासारख जीवन


'या' मंत्राचा जप नक्की करा!


हा विधी केल्यानंतर सूर्यची पूजा करुन ब्राह्मणांची पूजा करा. त्यांना मनोभावे लाल रंगाचे वस्त्र आणि सूर्य मंडळ अर्पण करा. हे दान करताना 'आदित्यतेजसोत्पन्नं राजतं विख्यातम्, श्रेयसे मम विप्र त्वं प्रतिगृहेणदमुत्तमम्' या मंत्राचं जप करा. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दान करताना मंत्र म्हटल्याने दानाचे पूर्ण पुण्य मिळते. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)