Rajyog In Kundli: वैदिक ज्योतिषानुसार जानेवारीमध्ये अनेक शुभ आणि राजयोग जुळून येणार आहे. ज्याचा परिणाम मानवाचे आयुष्य आणि पृथ्वीवर पाहायला मिळणार आहे. 1 जानेवारी रोजी सूर्य आणि मंगळ यांच्या युतीमुळं आदित्य मंगल राजयोग तयार होत आहे. तर, चंद्र आणि गुरु यांच्या युतीमुळं गजकेसरी राजयोग आणि आयुष्मान योग जुळून आला आहे. या तीन राजयोगांचा प्रभाव सर्व राशींवर राहणार आहे. मात्र तीन राशी अशा आहेत ज्यांचा भाग्योदय होणार आहे. त्याचबरोबर या राशींना चांगले दिवस येणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.


मेष राशी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जानेवारी महिन्यात जुळून येणारे 3 राजयोग या राशीच्या लोकांसाठी लाभकारी ठरणार आहेत. या काळात करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. तर, नोकरीतही प्रगती होऊ शकते. आर्थिक बचतही तुम्ही करु शकता. या वर्षात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे त्याचबरोबर नातेसंबंधही अधिक दृढ होतील. तुमच्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुम्हाला नवीन आर्थिक पर्याय उपलब्ध होतील. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे ते या वर्षांत करु शकता. 


वृश्चिक रास 


तीन राजयोग वृश्चिक राशीसाठी शुभ फलदायी ठरणार आहेत. या काळात तुम्ही एखादे वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करु शकणार आहेत. त्याचबरोबर या काळात तुमचे काम अधिक चांगले होणार आहे त्यामुळं ऑफिसमध्ये तुमचे कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमच्या नियोजनानुसार तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात येईल. त्याचबरोबर तुम्ही कामा व व्यवसायासंदर्भात विदेश यात्रा कराल आणि हा प्रवास तुमच्यासाठी शुभदेखील ठरेल. या काळात तुम्हाला नशीबाची साथही मिळेल. 


मकर रास 


मकर राशींच्या लोकांसाठी तीन राजयोग म्हणजे वरदान ठरणार आहे. कारण हे राजयोग तुम्हाला प्रत्येक कामात यशस्वी करतील. त्याचबरोबर ज्यांना नवीन कामाची सुरुवात करायची आहे ते या नवीन वर्षांत करु शकता. या वर्षात तुमच्या आयुष्यात सुख- समृद्धी आणि ऐश्वर्य मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठीही हे नवीन वर्ष फलदायी ठरेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )