Aditya Mangal Rajyog 2024: ग्रह ज्योतिष्य शास्त्रात, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या ज्योतिष्य शास्त्रात सूर्य देवाला मान, प्रतिष्ठा, नोकरी यांचा कारक मानला जातो. तर मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. याशिवाय मंगळ धैर्य, शौर्य, जमीन आणि क्रोध यांचा कारक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यावेळी सूर्य आणि मंगळ हे दोन्ही ग्रह जानेवारीमध्ये धनु राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे आदित्य मंगल राजयोग तयार होईल. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्याचं नशीब चमकू शकणार आहे. या काळात त्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे. 


मेष रास (Aries Zodiac)


आदित्य मंगल राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. तसंच तुमचं महत्त्वाचे काम पूर्ण होणार आहे. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. जर सर्व योजना तुमच्या नियोजनानुसार पूर्ण झाल्या तर तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. तुम्ही काही मालमत्ता देखील खरेदी करू शकता. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. 


मीन रास (Meen Zodiac)


आदित्य मंगल राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घरावर तयार होणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. जोडीदार तुमच्या जीवनात प्रवेश करू शकतो. स्टॉक मार्केट आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवू शकता. तुमचे वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. 


कन्या रास (Kanya Zodiac)


आदित्य मंगल राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकणार आहे. या काळात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. नोकरी बदलण्यात तुम्हाला यश मिळू शकणार आहे. व्यावसायिकांना चांगला नफाही मिळू शकतो. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )