Aditya Mangal Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रमुख 5 राजयोग असतात. मंगळापासून रुचक योग, बुधपासून भद्रा, गुरूपासून हंस, शुक्रापासून मालव्य आणि शनिपासून शशा योग तयार होतो. जेव्हा जेव्हा एका ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत किंवा नक्षत्रात स्थान बदलतो तेव्हा शुभ अशुभ योग तयार होत असतात. यात काही राजयोग ही असतात जे लोकांच नशीब एका रात्रीत पालटतात. सध्या सूर्यदेव हा तूळ राशीत विराजमान आहे. त्यात मंगळदेव आणि बुध आधीपासून तूळ राशीत आहे. अशा स्थितीत 100 वर्षांनंतर आदित्य मंगल योग निर्माण होतो आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळून निघणार आहे. 


'या' राशी होणार एका रात्रीत श्रीमंत ?


मिथुन (Gemini Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी आदित्य मंगल योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या पाचव्या घरात हा शुभ योग निर्माण होतो आहे. या लोकांना मुलांकडून कानावर आनंदाची बातमी पडणार आहे. तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होणार आहे. त्यात 30 ऑक्टोबरला राहू केतू गोचर करणार आहे. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी तुम्हाला लाभणार आहे. नवीन नोकरीचा शोध घेत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. प्रेम जीवनासाठीही हा योग भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. 


सिंह (Leo Zodiac) 


या राशीच्या लोकांच्या कुंडलीतील सातव्या घरात आदित्य मंगल योग तयार होतो आहे. यामुळे तुम्हाला धैर्य आणि शौर्य लाभणार आहे. भावा बहिणीमधील नात अधिक मजबूत होणार आहे. कोर्ट कचेरीच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे. ज्या लोकांचे काम आणि व्यवसाय परदेशाशी संबंधित आहेत त्यांना फायदा होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा या योगामुळे पूर्ण होईल. वाहन आणि मालमत्ता खरेदीचे शुभ योग जुळून आले आहेत. 


तूळ (Libra Zodiac)


या राशीत्या कुंडलीतील सातव्या घरात हा योग निर्माण होतो आहे. या योगामुळे तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. प्रगतीचे दरवाजे तुमच्यासाठी खुली होणार आहे. सरकारी क्षेत्रातील कामं मार्गी लागणार आहे. व्यवसायात तुम्ही नवीन योजनेअंतर्गत काम करण्यात यशस्वी होणार आहे. मानसिक स्ठिती सुधारणार आहे. कार्यक्षेत्रात सर्वांची साथ मिळणार असून तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. तुमच्या योजनेचा भविष्यात फायदा होणार आहे. जोडीदाराची तुम्हाला उत्तम साथ मिळणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी असणार आहे. अविवाहितांना लग्नाची मागणी येणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)