Astrology in Marathi : ज्योतिषशास्त्रात शनि संक्रमण आणि सूर्यग्रहण या दोन्ही घटना अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. न्यायदेवता आणि कर्माचा दाता शनिदेव स्वगृही कुंभ राशीत स्थित आहे. येत्या नवीन वर्षात 2025 मध्ये शनि देवगुरू गुरूच्या मीन राशीत गोचर करणार आहे. पुढच्या वर्षी पिता पुत्र शनिदेव आणि सूर्य एकत्र आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हा योग काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. शनि गोचर आणि सूर्यग्रहण तब्बल 10 वर्षांनी एकत्र होणार आहे. याचा लाभ 3 राशींच्या लोकांना होणार आहे. (After 10 years Saturn transit and solar eclipse together Financial gain with success for 3 zodiac people till 2027)


2025 कधी असणार आहे सूर्यग्रहण ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू पंचांगानुसार 29 मार्च 2025 ला रात्री 11.01 वाजता शनि कुंभ रास सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत शनिदेव अडीच वर्ष असणार म्हणजे  3 जून 2027 पर्यंत या राशीत असणार आहे. त्यानंतर शनिदेव मेष राशीत प्रवेश करेल. तर  29 मार्च 2025 ला शनि गोचरसोबत सूर्यग्रहणही होणार आहे. 


'या' राशींसाठी भाग्यशाली ठरणार शनि गोचर आणि सूर्यग्रहण 


सिंह (Leo Zodiac) 


सूर्यग्रहणाच्या दिवशी शनि संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होणार आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने या राशीच्या लोकांना त्रासातून आराम मिळणार आहे. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक आघाडीवर यश प्राप्त होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत. व्यवसायात नफा आणि उत्पन्न वाढ होणार आहे. 


तूळ (Libra Zodiac)  


या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. शनिदेवाच्या कृपेने जीवनात सुखाची प्राप्ती होणार आहे. आर्थिक अडचणीतून तुमची सुटका होणार आहे. मार्च 2025 नंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. 


मीन  (Pisces Zodiac)  


शनीच्या राशी बदलामुळे मीन राशीच्या लोकांसाठी सुख-समृद्धी प्राप्त होणार आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुख आणि संपत्ती प्राप्त होणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होणार आहेत. हा काळ कष्टकरी लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)