Mars Transit 2024 in Taurus : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे त्यांचा इतर ग्रहांशी संयोग बनवतात. असंच या काळात दोन ग्रहांचा एकमेकांशी संयोग झाला आहे. यावेशी मंगळ वृषभ राशीत पोहोचला आहे, जिथे गुरू आधीच स्थित आहे. अशा स्थितीत 12 वर्षांनंतर या दोघांच्या संयोगामुळे वृषभ राशीत गुरु-मंगळ राजयोग तयार झाला आहे. यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे. 


वृषभ रास (Taurus Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरु-मंगळ राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या चढत्या घरावर तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. व्यवसायातील कोणतीही महत्त्वाची योजना पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी वेळ अतिशय शुभ आहे. तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. जर तुम्ही राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला चांगले यश मिळू शकते.


सिंह रास (Leo Zodiac)


गुरु-मंगळ राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळू शकतं. सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. नोकरदार लोकांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकते. 


तूळ रास (Tula Zodiac)


गुरु-मंगळ राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरदार लोकांसाठी यावेळी उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. यावेळी तुमची लोकप्रियता वाढेल. शेअर मार्केटमध्येही नफा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनातही शांततेचे वातावरण राहील.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)