Surya Grahan 2023 : ग्रहण हे विज्ञानिक घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात याला अतिशय महत्त्व आहे. आज या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण आहे. आज सर्वपित्री अमावस्या असून दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. ग्रहण काळात सूर्य आणि बुध कन्या राशीत असणार आहे. त्यामुळे सूर्य-बुध संयोगामुळे बुधादित्य योग तयार होतो आहे. सूर्यग्रहण अमावस्या तिथीला आल्यामुळे याचं महत्त्व अधिक वाढलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 178 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण आले आहे. यापूर्वी 1845 मध्ये सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण झाले होते. हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे सूतक काळ नसणार आहे. मात्र सूर्यग्रहणाचा परिणाम राशींवर पडणार आहे. कोणत्या राशींना सतर्क राहायचं आहे याबद्दल जाणून घेऊयात. 


कर्क (Cancer Zodiac) 


सूर्यग्रहण काळात या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. तुम्हाला पोटासंबंधित विकार जाणवू शकतात. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. मुलांकडून वाईट बातमी मिळू शकते. ग्रहण काळात तुम्हाला शुभ कार्य करणे टाळावे लागेल. 


सिंह (Leo Zodiac) 


सूर्य देव हा सिंह राशीचा स्वामी आहे. त्यामुळे सूर्यग्रहण काळात या राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. मनात अनेक नकारात्मक विचार घर करणार आहे. तुमचं मन उदास राहील. त्या विचारांना तुमच्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. जास्त जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत वाद होण्याची भीती आहे. सूर्यग्रहण काळात वादविवादापासून दूर राहा. 


कन्या (Virgo Zodiac) 


या राशीच्या लोकांनी सूर्यग्रहणात अतिशय सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनावश्यक चिंता मनात घर करणार आहे. या काळात मोठे निर्णय टाळा. अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान सहन करावा लागू शकतो. भावनिक होऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. असहाय व्यक्तीचा अपमान करु नका. 


धनु (Sagittarius Zodiac)


सूर्यग्रहण काळात या राशीच्या लोकांना मोठा फटका बसणार आहे. व्यापारात आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. वादविवादापासून जेवढं शक्य तेवढं दूर राहा. अन्यथा तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. 


मकर (Capricorn Zodiac)


सूर्यग्रहण या राशीच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे. तुमच्या उत्पन्नात घट होणार आहे. आर्थिक स्थिती ढासळणार आहे. अनोळखी व्यक्तीकडून सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नोकरीची संबंधित वाईट बातमी मिळण्याची शक्यात आहे. व्यवसायिकांना छुप्या शत्रूपासून सावध राहावं लागणार आहे. 



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)