Shukra Nakshatra Gochar 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो. याशिवाय तो ठराविक काळानंतर नक्षत्रही बदलतो. शुक्राच्या स्थितीतील बदलाचा 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र 29 जानेवारीला संध्याकाळी 5.06 वाजता पूर्वाषादा नक्षत्रात प्रवेश करत आहे. शुक्राचा स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. पूर्वाषादा नक्षत्र हे २७ नक्षत्रांपैकी २०वे नक्षत्र मानले जाते. याचा स्वामी स्वतः शुक्र आहे. शुक्राच्या स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने कोणत्या राशींना खूप फायदा होणार आहे हे जाणून घेऊया. 


मेष रास (Mesh Zodiac)


नक्षत्र बदलून शुक्र या राशीच्या नवव्या घरात प्रवेश करत आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या समर्पण आणि मेहनतीची प्रशंसा होईल. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. वैवाहिक आणि प्रेम जीवनाबद्दल बोलल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळणार आहे. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो.


मिथुन रास (Mithun Zodiac)


शुक्र पूर्वाषाधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि या राशीच्या सातव्या भावात वास्तव्य करणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंदच राहणार आहे. तुम्ही अविवाहित असाल, तर तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीला भेटू शकता. तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल. कोणतीही गुंतवणूक कराल तर तुम्हाला भविष्यात फायदा होईल.


धनु रास (Dhanu Zodiac)


पूर्वाषादा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर शुक्र तुमच्या राशीमध्ये चढत्या घरात असणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही व्यवसायात प्रचंड यश मिळवून आर्थिक नफा देखील मिळवू शकता. तुमचा वैयक्तिक विकास होईल. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता पूर्ण होऊ शकतात. यश मिळण्यासोबतच तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत चांगला समन्वय निर्माण होईल. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)