Shukra-Shani Yuti: 30 वर्षानंतर शनी-शुक्राची होणार युती; 2024 मध्ये `या` राशींना लाभ मिळण्याची शक्यता
Conjunction Of Saturn And Venus 2024: शनिदेव सध्या कुंभ राशीमध्ये भ्रमण करत आहेत आणि 2024 च्या सुरुवातीला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे या दोन ग्रहांचा संयोग कुंभ राशीत होणार आहे.
Conjunction Of Saturn And Venus 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी नव्या वर्षात देखील अनेक ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये बदल करणार आहेत. 2024 च्या सुरुवातीला अनेक अनुकूल ग्रह एकत्र येणार आहेत. ज्यामध्ये शुक्र आणि शनिदेव यांचाही समावेश आहे.
शनिदेव सध्या कुंभ राशीमध्ये भ्रमण करत आहेत आणि 2024 च्या सुरुवातीला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे या दोन ग्रहांचा संयोग कुंभ राशीत होणार आहे. हा संयोग शनीच्या स्वतःच्या कुंभ राशीत 30 वर्षांनंतर तयार होतोय. या संयोगामुळे काही राशींच्या नशीबात चांगले दिवस येणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मेष रास (Aries Zodiac)
शुक्र आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. तुमच्या जीवनात शुभ प्रभाव वाढतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित शुभ परिणाम मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. तुम्हाला शेअर बाजार, लॉटरीमध्ये केलेल्या गुंतवणूकीचा नफा मिळू शकतो.
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा योग अनुकूल ठरू शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे आणि वैवाहिक जीवन चांगले होणार आहे. नुकताच अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.
मकर रास (Makar Zodiac)
शुक्र आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमच्या आयुष्यात पैसे कमावण्याच्या अनेक संधी येतील. पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवू शकणार आहात. शनिदेव तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही अधिक मेहनत कराल. तुमचा आत्मविश्वासही वाढण्याची शक्यता आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )