Shani Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता आणि कर्मदाता शनिदेव 29 मार्च 2025 पर्यंत स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. या वर्षभरात शनिदेव आपली स्थिती बदल असतो. तब्बल 30 वर्षांनंतर 12 मे म्हणजे आज सकाळी 8.07 मिनिटांनी शनिदेव पूर्वाभाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात हालचाल केली आहे. यानंतर 18 ऑगस्टनंतर शनि वक्री स्थितीत येणार आहे. शनिदेवाच्या या स्थितीबदलामुळे काही राशींवर शनिदेव विशेष आशीर्वाद बरसणार आहे. कुठल्या आहेत त्या राशी जाणून घ्या. (After 30 years Shani Gochar in Purvabhadrapada Nakshatra next 4 months will shower wealth on these zodiac signs)


मेष रास (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांना शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा फायदा होणार आहे. शनिदेव सध्या मेष राशीच्या उत्पन्नाच्या घरात असल्याने या लोकांना शनिदेवाच्या हालचालीमुळे आर्थिक लाभ होणार आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळणार आहेत. अडकलेले पैसेदेखील पुन्हा मिळणार आहेत. तुमचं मन मात्र अस्वस्थ असणार आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्याल. 


वृषभ रास (Taurus Zodiac) 


देवगुरु गुरु वृषभ असून शनिदेव वृषभ राशीच्या करिअर घरात विराजमान आहे. या घराचा स्वामी शनिदेव असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार व्यवसायातही यश मिळणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Shani Nakshatra Gochar : 'या' लोकांना शनिदेव खूप रडवणार; शनि नक्षत्र बदलाने 3 राशींसाठी वाईट काळ


मकर रास (Capricorn Zodiac)   


सध्या मकर राशीच्या धन गृहात शनिदेवाचे स्थान असून त्याचवेळी मकर राशीत साडे सातीचा शेवटचा टप्पा चालू आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. या राशीचा स्वामी शनिदेव असल्याने मकर राशीला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळणार आहे. तसंच वाईट गोष्टींचा नाश होणार आहे. 


कुंभ रास (Aquarius Zodiac) 


या राशीच्या लोकांनाही शनीच्या चालीतील बदलाचा फायदा होईल. या राशीच्या लोकांना शनिदेवाची कृपा बरसणार आहे. शनिदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात लाभ मिळणार आहे. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी वस्तुस्थिती नीट तपासणे तुमच्या हिताच ठरेल. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)