Shani Gochar in Kumbh 2023: शनी कुंभ राशीत गोचर होत आहे. त्यामुळे एक दुर्मिळ योगायोग होत आहे. हिंदू धर्मात,  श्रावण महिना अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. दुसरीकडे, यंदा श्रावण महिन्यातील अतिरिक्त महिन्यामुळे हा महिना 59 दिवसांचा असणार आहे. श्रावण 4 जुलै 2023 पासून सुरु झाला आहे आणि 31 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल. श्रावणामध्ये अधिक महिन्यांचा योगायोग 19 वर्षांनंतर आला आहे. त्याचवेळी, ज्योतिषशास्त्रानुसार, या पावसाळ्यात एक विशेष योगायोग घडत आहे. वास्तविक, 30 वर्षांनंतर, शनी आपल्या राशीमध्ये श्रावण महिन्यात कुंभ राशीत राहील. त्यामुळे भोलेनाथ तसेच शनिदेवाची कृपा मिळविण्यासाठी श्रावण महिना विशेष असेल. एवढेच नाही तर शनिदेवाचे संपूर्ण श्रावण महिन्यात 4 राशीच्या लोकांना विशेष आशीर्वाद असणार आहेत.  याचा काही राशींच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे.


श्रावण महिन्यामध्ये या राशींवर शनीची कृपा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : 


शनी गोचर होत आहे. त्याचवेळी 30 वर्षांनंतर, शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत आहे.  मेष राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना चांगला जाणार आहे. या लोकांना नोकरी-व्यवसायात जोरदार यश मिळू शकते. तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी बढती मिळू शकते. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. 31 ऑगस्टपर्यंतचा काळ या लोकांसाठी सन्मान आणि प्रगतीचा असेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


मिथुन : 


नोकरीत प्रगती होईल. व्यवसाय चांगला चालेल. नफा वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. मुलाची प्रगती होईल. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. श्रावण महिन्याचा काळ मिथुन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. 


सिंह  : 


शनिदेव आणि भोलेनाथ यांची विशेष कृपा या राशींच्या लोकांवर असणार आहे. त्यामुळे हे लोक खूप प्रगती करतील. तुम्हाला प्रदीर्घ प्रलंबित पदोन्नती मिळू शकते. पगारात वाढ होऊ शकते. जीवनात सुख-सुविधा वाढतील. नवीन काम सुरु करु शकाल. वैवाहिक जीवनातील तणाव दूर होईल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ राहील. 


वृश्चिक : 


शनी गोचर होत असल्याने वृश्चिक राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन नोकरी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)