Parakram Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतो. त्याप्रमाणे काही ग्रह नक्षत्रात देखील बदल करतात. येत्या 3 डिसेंबर रोजी दुपारी 1.13 वाजता सूर्य ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यासोबतच मंगळही 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठा नक्षत्रात दोन्ही ग्रहांचा संयोग झाल्याने पराक्रम नावाचा योग तयार होणार आहे. सूर्य आणि मंगळ एकत्र आल्याने काही राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे. ज्योतिषांच्या मते, हा योग काही राशींच्या आयुष्यात फक्त आनंद आणू शकतो. जाणून घेऊया पराक्रम योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.


मेष रास


मेष राशीच्या लोकांसाठी पराक्रम राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी समाजात मान-सन्मान वाढणार आहे. या काळात करिअर उजळण्याची संधी मिळू शकते. व्यवसायातही भरपूर यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळू शकते. जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होणार आहेत. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे.


सिंह रास


या राशीच्या लोकांसाठी पराक्रम योग देखील शुभ सिद्ध होऊ शकतो. ज्येष्ठा नक्षत्रात पराक्रम योग तयार झाल्याने प्रत्येक क्षेत्रात धैर्य आणि आत्मविश्वासाने यश मिळू शकते. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कौटुंबिक कलहातून तुम्हाला आराम मिळू शकणार आहे. तुमच्या करिअरमध्येही मोठी उडी घेऊ शकता. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते.


तूळ रास


तूळ राशीच्या लोकांसाठीही पराक्रम योग फायदेशीर ठरू शकतो. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना थोडी मेहनत करावी लागेल. तूळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप शुभ आहे. या महिन्यात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते. तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकता. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)