Four Rajyog In Diwali 2023 : नवरात्रीनंतर दसरा आणि मग लागते ती दिवाळीची उत्सुकता. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा आणि लक्ष्मीच्या आगमनाचा सण. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. दिवाळीला गणराया आणि देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. पण यंदा खऱ्या अर्थाने तुमच्या दारात लक्ष्मीचं आगमन होणार आहे. ही दिवाळी शुभ असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकानुसार या दिवाळीत चार शुभ असे राजयोग निर्माण होणार आहे. शनिदेवामुळे शश रायजोग, मंगळ सूर्य युतीचा राजयोग, आयुष्यमान योग तर सूर्यदेवाने तूळ राशीत प्रवेश केल्यामुळे नीचभंग राजयोग निर्माण झाला आहे. या चार राजयोगामुळे काही राशींची लोक धनवान होणार आहे. (After almost 500 years 4 auspicious RajYogas in Diwali 2023 Lakshmi along with Shani will give wealth to these zodic signs)


'या' राशींना मिळणार छप्पडफाड संपत्ती


मकर (Capricorn Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीत निर्माण होणाऱ्या राजयोगामुळे मकर राशीच्या लोकांना तो भाग्यशाली ठरणार आहे. दिवाळीत या लोकांना अचानक पैसा मिळणार आहे. त्यामुळे दिवाळीचा खर्च झाला तरी या लोकांना झालेल्या धनलाभामुळे यांचं बँक बॅलेन्स मजूबत स्थितीत येणार आहे. हे राजयोग या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. नशिबाची साथ काय असते याची प्रचिती या लोकांना येणार आहे. दिवाळी बोनस असो किंवा गुंतवणुकीतून या लोकांना धनलाभ होणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


चार राजयोगासोबत दिवाळीत मिथुन राशीच्या लोकांच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे. सुख समृद्धीसोबत माता लक्ष्मी आणि शनिदेव यांच्यावर छप्पडफाड पैशांची बरसात करणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात शुभ वार्ता तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायिकांना आतापर्यंत केलेल्या करारातून आणि गुंतवणुकीतून नफा होणार आहे. त्यामुळे या राशीचं बँक बॅलेन्स तगड होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Shani Margi 2023 : शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ! दसरा दिवाळीला 'या' राशी होणार श्रीमंत


मेष (Aries Zodiac)


मेष राशीच्या लोकांसाठी हे राजयोग एका वरदानासारखं सिद्ध होणार आहे. त्यात 30 ऑक्टोबरला या लोकांच्या कुंडलीतील गुरु चांडाळ योग संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातच या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये यश आणि आर्थिक लाभ यामुळे या लोकांच्या घरात आनंदच आनंद असणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)