Shani Margi 2023 : शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ! दसरा दिवाळीला 'या' राशी होणार श्रीमंत

Shani Margi 2023 : दसरा दिवाळीला शनिदेव काही राशींच्या लोकांना मालामाल करणार आहे. शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ मिळणार आहे. त्यामुळे नवमीपासून काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 19, 2023, 11:30 AM IST
Shani Margi 2023 : शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ! दसरा दिवाळीला 'या' राशी होणार श्रीमंत
Siddhi Yoga support for Shani Dev Shani Margi 2023 these 3 zodiac sign will be rich on Dussehra Diwali

Shani Margi 2023 / Sarvartha Siddhi Yoga : न्यायदेवता आणि कर्माचा दाता शनिदेव जेव्हा कधी आपली स्थिती बदलतो याचा परिणाम 12 राशींच्या लोकांवर दिसून येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा जाचकाला त्याचा कर्माची फळं देतो. चांगले कर्म असेल तर चांगले आणि वाईट कर्म असेल तर शिक्षा देतो. शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सर्वात संथ गतीने म्हणजे जवळपास अडीच वर्ष लावतो. 

Add Zee News as a Preferred Source

या वर्षी शनिदेव स्वगृही कुंभ राशी विराजमान झाला आहे. आता शनिदेव लवकरच मार्गी होणार आहे. नवरात्रीच्या नवमी तिथीला शनिदेव मार्गी होऊन 4 नोव्हेंबरला ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे. या प्रक्रियेत शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ मिळणार आहे. नवमी तिथी म्हणजे 23 ऑक्टोबर आणि  4 नोव्हेंबर सर्वार्थ सिद्धी योग आहे. तुमच्या राशीचा भाग्यशाली राशीत समावेश आहे का जाणून घ्या. (Siddhi Yoga support for Shani Dev Shani Margi 2023 these 3 zodiac sign will be rich on Dussehra Diwali)

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीला शनिदेव आणि सर्वार्थ सिद्धीचा जबदस्त फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होणार असून तुमच्या मान सन्मान वाढणार आहे. आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. घरातून तुमच्या कानावर गोड बातमी मिळणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनिदेव आनंद घेऊन येणार आहे. कुटुंबात सुख समृद्धी वाढणार आहे. महिलांसाठी आनंदायी वातावरण असणार आहे. कामाचं नियोज व्यवस्थित केल्यास तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. शनिदेव तुमच्यासाठी धनाची पेटी घेऊन येणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Navratri 2023 : 100 वर्षांनंतर नवरात्रीत शश योगासोबत 2 राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. दसरा दिवाळी मालामाल करणार आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांना नफा होणार आहे. गुंतवणुकीतून जबरदस्त फायदा होणार आहे. राजकारणात प्रवेश करण्यासाठी योग वेळ आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. संवादातून मन जिंकणार आहात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More