Rahu Ketu Shani Gochar : हे वर्ष ग्रहणांच्या दृष्टीने अतिशय खास आहे. या वर्षी एकूण 4 ग्रहण होते, त्यातील दोन ग्रहण झाले आहे. आता वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण सर्व 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करणार आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण हे 29 ऑक्टोबरला असणार आहे. त्यानंतर शनि आणि राहू केतू आपली स्थिती बदलणार आहे.  30 ऑक्टोबरला राहु आणि केतू गोचर करणार आहे. म्हणजे राहु मेष राशीतून मीन राशीत आणि केतूही तूळ राशीतून कन्या राशीत संक्रमण करणार आहे. यानंतर 4 नोव्हेंबरला शनी स्वतःच्या कुंभ राशीत थेट फिरणार आहे. आठवडाभरात ग्रहांच्या या बदलामुळे तीन राशींचं लोकांचे नशीब चंद्रासारखं चमकणार आहे. (after lunar eclipse will change 3 zodiac people Rahu Ketu Shani Gochar get money Chandra Grahan 2023)


मिथुन (Gemini Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रग्रहणानंतर होणाऱ्या शनि आणि राहू-केतूचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी खूप जास्त भाग्यशाली ठरणार आहे. या ग्रहांच्या बदलामुळे तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर ते परत मिळणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्ही आणि घरात आनंदी आनंद असणार आहे. जर तुम्ही कुठली परीक्षा किंवा स्पर्धा, मुलाखत देणार असेल तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. व्यावसायिकांना नफा मिळणार आहे. 


कर्क (Cancer Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठी राहू-केतू-शनीची स्थिती आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. या काळात तुमच्या कुठल्याही मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायिकांना लाभ होणार आहे.  विशेषत: भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. बँक बॅलेन्स वाढणार आहे. 


सिंह (Leo Zodiac)


राहू-केतू-शनीच्या स्थितीतील बदल या राशीच्या लोकांसाठी वरदानपेक्षा कमी नसणार आहे. या लोकांची कोणतीही मोठी समस्या सहज सुटणार आहे. नवीन नोकरीसाठी प्रयत्न यशस्वी होणार आहे. व्यवसायाचा विस्तार होणार आहे. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फलदायी असणार आहे. तुमच्या आयुष्यात मोठा आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. जोडीदाराशी संबंध मजबूत होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Shani Gochar : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांवर होणार महाधनलाभ! शनिदेव देणार बक्कळ पैसा


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)