Akshaya Tritiya Tignificance : एखाद्या चांगल्या मुहूर्तावर आपण काम सुरु केले तर त्याचे फळ चांगले मिळते.  जर तुम्ही काही चांगले काम करण्याचा विचार केला असेल तर एक दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला तुम्ही जे काही शुभ कार्य सुरु कराल, त्याचे पुण्य कधीच कमी होत नाही. अक्षय्य गुणांमुळे या तिथीला अक्षय्य तृतीया असेही म्हणतात. काही भागात या तिथीला अखातीज नावानेही संबोधले जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार, ही तारीख रविवार, 23 एप्रिल 2023 रोजी येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पौराणिक ग्रंथानुसार या दिवशी जे काही शुभ कार्य किंवा काम केले जातात, त्याचे अक्षय फळ मिळते. या शुभ दिवशी पंचांग न पाहता शुभ कार्य करता येते. या दिवशी पितरांसाठी केलेला नैवेद्य आणि कोणत्याही प्रकारचे दान केल्याने चांगले फळ मिळते, असे पुराणात सांगितले आहे. हा सण सोमवारी किंवा रोहिणी नक्षत्राच्या दिवशी आला तर त्याचे फळ अनेक पटींनी वाढते.


अक्षय्य तृतीयेचे काय आहे महत्त्व?


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरु होते. या दिवशी भगवान नर नारायण, परशुराम आणि हयग्रीव अवतरले होते, असे मानले जाते. याशिवाय ब्रह्माजींचा मुलगा अक्षय कुमार याचाही जन्म याच दिवशी झाला होता. या दिवशी महाभारताचे युद्ध सुरु झाले होते, ज्यामध्ये कौरव आणि पांडवांच्या बाजूचे लाखो वीर मरण पावले होते. द्वापार युगाचा अंतही याच दिवशी झाला. 


एवढेच नाही तर भगवान श्रीकृष्णाने या दिवशी युधिष्ठिराला सांगितले होते की, या दिवशी केलेली कोणतीही नवीन निर्मिती किंवा कोणतेही प्रापंचिक कार्य निश्चितच पुण्यकारक ठरते, म्हणून या दिवशी लोक आपल्या दुकानाचे किंवा कारखान्याचे उद्घाटन करतात. नवीन घर पायाभरणी किंवा भूमी पुजन करतात इत्यादी. या दिवशी केलेले कोणतेही कार्य फलदायी होते. त्यामुळे यादिवशी फलदायी काम करा.