Akshaya Tritiya  Marriage Shubh Muhurat Dates 2024 : वर्षभरात अक्षय्य तृतीया हा असा दिवस असतो जो कुठल्याही शुभ कार्यासाठी शुभ मानला जातोय. या दिवसासाठी कोणतेही पंचांग बघायची गरज पडत नाही. पण यंदा अक्षय्य तृतीयाला तुम्ही शुभ कार्य करु शकता पण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यादिवशी एक दुर्मिळ योग जुळून आला आहे. अक्षय्य तृतीयाला जर तुमच्या घरात लग्नाची सनईचौघड्या वाजवण्याची तयारी सुरु असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 


23 वर्षांनंतरही अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योग! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगकर्ते आणि वैदिक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्यानुसार अक्षय्य तृतीयाला तब्बल 23 वर्षांनंतर लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही. त्याशिवाय या दिवशी तुम्ही वास्तू पूजाही करु शकणार नाही. 


हेसुद्धा वाचा - लग्न, गृहप्रवेश ते नामकरण...अक्षय्य तृतीयासह मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?


अक्षय्य तृतीया कधी आहे ?


पंचांगानुसार अक्षय्य तृतीया 10 मे रोजी असणार आहे. पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीपासून ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीपर्यंत बृहस्पति नक्षत्राचा अस्त होणार आहे. याचा अर्थ 7 मे  ते 31 मेपर्यंत हा काळ असणार आहे. 


वधूवरांना पाहावी लागणार इतके दिवस वाट 


ज्योतिषशास्त्रानुसार लग्नासाठी गुरू आणि शुक्र हे ग्रह कारक मानले जातात. त्यामुळे गुरू आणि शुक्र उदय स्थितीत असेल तर विवाहासाठी शुभ मुहूर्त असतो. पण जेव्हा हे ग्रह अस्त स्थितीत असतात लग्नासाठी मुहूर्त नसतो. त्यानुसार सध्या गुरु वृषभ राशीत आणि शुक्र तर मेष राशीत अस्त झाला आहे. आता शुक्र ग्रह 7 जुलैला उदय होणार आहे. त्यामुळे वधूवरांना लग्नासाठी 81 दिवस वाट पाहावी लागणार आहे. याचा सरळ अर्थ मे आणि जून महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त नाहीत. 


हेसुद्धा वाचा - Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग! 'या' राशीचे लोक एका दिवसात बनतील श्रीमंत?


जुलैनंतर लागणार 4 महिने लग्नांना ब्रेक !


7 जुलैला शुक्र उदयास आल्यानंतर लग्नासाठी शुभ मुहूर्त आहे पण 17 जुलैला देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरु होणार आहे. हिंदू धर्मात चातुर्मास शुभ कार्य केलं जात नाही. हे शुभ कार्य देवूठाणी एकादशीपासून सुरु होतात. यंदा देवूठाणी एकादशी ही 12 नोव्हेंबरला असणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)