मुंबई : अक्षय्य तृतीया हा हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी सोन्याची खरेदी करणं शुभ समजलं जाते. लग्नाचा मौसम असल्याने किंवा भविष्यातील तरतूद म्हणून तुम्हीदेखील अक्षय्य तृतीयेचा योग साधत सोनं खरेदीचा विचार करत असाल तर थोडं थांबा  आणि या गोष्टी लक्षात ठेवूनच सोन्याची खरेदी करा.  अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ


 
 24 कॅरेट सोनं  -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 24 कॅरेट सोनं हे अस्सल शुद्ध सोनं म्हणून ओळखलं जातं. मात्र तुम्ही हे सोनं भविष्यात दागिने करण्याच्या हेतूने घेत असाल तर 24 कॅरेट सोनं घेणं निरूपयोयी ठरणार आहे.  
 दागिने हे 18 किंवा 22, 23 कॅरेट्समध्ये बनवले जातात.  24 कॅरेट्सच्या तुलनेत त्याची किंमतही कमी असते.  


 ट्रेडमार्क  -  


 सोनं खरेदी करताना त्यावरील ट्रेडमार्कसही तपासून पहा. ट्रेडमार्क हे सोन्याच्या शुद्धतेच्या खात्री देते. ज्या दागिन्यांवर, सोन्याच्या बिस्किटं, वळीवर ट्रेडमार्क नसेल तर त्याची खरेदी करणं टाळा.  


सोन्यावर खडे, मोती असलेले दागिने घेताना  


सोन्यामध्ये मोती किंवा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही इतर खड्यांचं काम असेल, मीनावर्क असेल तर असे दागिने विकत घेताना काळजी घ्या. कारण भविष्यात जर तुम्हांला अशाप्रकारचे दागिने विकावे लागल्यास त्यामधील केवळ सोन्याचे पैसे तुम्हांला मिळतील.  


भविष्यातील गुंतवणूक  


भविष्यात गुंतवणूक म्हणून अक्षय्य तृतीयेला तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर ते सोन्याचे बिस्किट किंवा वळी किंवा कॉईनच्या स्वरूपात विकत घ्या.