Amla Rajyoga : गुरु-शुक्रमुळे तयार झाला पॉवरफुल अमला राजयोग! `या` राशींसाठी ठरणार वरदान
Amla Rajyoga : गुरु आणि शुक्रमुळे पॉवरफुल अमला राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे चार राशींसाठी तो वरदान ठरणार असून संपत्ती, करिअर आणि सन्मान या लोकांना मिळणार आहे.
Amla Rajyoga : ज्योतिषशास्त्रात गुरु आणि शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. बृहस्पतिला देवतांलाच गुरु म्हटलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील गुरु ग्रह बलवान असेल तर जाचकाला ज्ञान, सुख, समृद्धी आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते. तर शुक्र हा संपत्तीचा कारक आहे. अशा स्थितीत गुरु 4 सप्टेंबरला प्रतिगामी झाला आहे. तर तो 31 डिसेंबर 2023 या स्थितीत असणार आहे. अशात गुरु आणि शुक्रमुळे तयार झालेला पॉवरफुल असा अमला राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (amla rajyoga of guru venus is a boon for 4 zodiac people will get job and moeny)
कर्क (Cancer Zodiac)
गुरु प्रतिगामीमुळे तयार झालेला अमला योग हा कर्क राशींच्या लोकांसाठी शुभ आहे. या काळात तुम्हाला कामात यश मिळणार आहे. जर जी लोक व्यवसाय करतात त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना या काळात नोकरीच्या चांगल्या संधी चालू येणार आहे. या काळात गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. आर्थिक लाभाच्या अनेक संधी या काळात तुम्हाला लाभणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
गुरु प्रतिगामी असल्यामुळे तयार झालेला अमला योग सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. व्यवसायात नवीन काम सुरु करण्यासाठी हा उत्तम काळ असणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल सिद्ध होईल. या काळात प्रवासातून आर्थिक लाभ होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. खाजगी व्यवसायात आर्थिक लाभाच्या अनेक संधी चालून येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जबाबदारी देण्यात येईल आणि अधिकार मिळेल.
धनु (Sagittarius Zodiac)
धनु राशीच्या लोकांसाठी गुरु प्रतिगामी भाग्यशाली ठरणार आहे. खरं तर, अमला योगामुळे या काळात तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असणार आहे. तुम्हाला खूप मोठा धनलाभ होण्याचे संकेत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला उदंड यश प्राप्त होणार आहे. या काळात उत्पन्न वाढून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतूनही तुम्हाला लाभ होणार आहे. प्रेम जीवनात यश मिळणार आहे. एकंदरीत हा अमला योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून घर किंवा गाडी खरेदीचे योगही जुळून आले आहेत.
मीन (Pisces Zodiac)
गुरु वक्रीमुळे तयार झालेला अमला राजयोग मीन राशीसाठी विशेष लाभदायक असणार आहे. या राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे कामात यश प्राप्त होणार आहे. यासोबतच या काळात गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होणार आहे. याशिवाय या काळात आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नोकरीत बढतीचा लाभ मिळणार आहे.
हेसुद्धा वाचा - Ashtalakshmi Rajyog : अष्ट लक्ष्मी राजयोग 'या' मंडळींसाठी वरदान! लक्झरी लाइफसोबत मिळणार संपत्ती
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)