Ruchak Rajyog 2024 : दर महिन्यात कोणते ना कोणते ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी जून महिन्यात पुन्हा एकदा काही ग्रहांचं संक्रमण होणार आहे. आगामी जून महिन्यात मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनी त्याच्या राशीत आणि हालचाली बदल कऱणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती आणि भूमी, धैर्य आणि शौर्य उर्जेचा कारक 1 जून रोजी आपल्या मूळ त्रिकोण राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाच्या स्थिती बदलामुळे रूचक राजयोग तयार होणार आहे. या रूचक राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना चांगला परिणाम मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत, ते पाहूयात.


मेष रास


मंगळाचे गोचरमुळे तयार होणाऱ्या राजयोगाची निर्मिती स्थानिकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. जुलैपर्यंत भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. नोकरदारांना वेतनवाढीसह पदोन्नतीची भेट होऊ शकते. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास आणि धैर्य वाढू शकणार आहे


कर्क रास


मूळ त्रिकोण राशीत मंगळाचं गोचर आणि रुचक राजयोग भाग्यवान ठरू शकतो. बेरोजगार लोकांना नोकरीमध्ये पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. व्यवसायात नवीन प्रकल्प मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. बरेच दिवस अडकलेले आणि अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात.


धनु रास


रूचक राजयोग या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढू शकणार आहे. तीर्थयात्रेला जाता येईल. उच्च शिक्षण आणि व्यवसायासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. या काळात नशिबाने साथ दिली तर तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )