Angarak Yog In Pisces : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असतो. हा संयोग कधी कधी शुभ तर कधी अशुभ असतो. असाच एक विध्वंसक योग मंगळ आणि राहूमुळे निर्माण होणार आहे. अंगारक योग हा अतिशय घातक असल्याचं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण मंगळ हा अग्नि तत्व असलेला क्रूर ग्रह आणि त्याच्यासोबत राहु हा अशुभ ग्रह यामुळे हा अंगारक योग त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक संटक आणतो. यासोबतच आयुष्यात काही दुर्घटना घडली की शत्रू वरचढ होताना दिसतात. या दोन ग्रहांच्या संयोगाने तयार होणारा अंगारक योग कोणत्या राशीसाठी घातक आहे जाणून घ्या. (Angarak Yoga will bring an earthquake in the life of  this zodiac sign Bad effects on health along with loss of wealth)


कधी आहे अंगारक योग?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी राहु मीन राशीत असून तो वर्षभर या राशीत असणार आहे. यासोबतच 23 एप्रिल 2024 ला ग्रहांचा सेनापती मंगळ मीन राशीत संक्रमण करणार आहे. याठिकाणी तो 31 मेपर्यंत असणार आहे. याचा अर्थ 23 एप्रिल ते 31 मे पर्यंत अंगारक योग असणार आहे. या काळात काही राशींना अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे. 


मेष रास (Aries Zodiac) 


या राशीमध्ये बाराव्या घरात अंगारक योग निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणं गरजेच आहे. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होणार आहे. यासोबतच तुमच्या विचारांमध्ये चढउतार पाहिला मिळणार आहे. शिक्षण, आरोग्य किंवा कौटुंबिक कारणांमुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्येही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एखाद्या छोट्या कामासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. यासोबतच प्रत्येक कामात अडथळे येणार आहेत. आरोग्याबाबतही थोडे सावध राहावं लागणार आहे. यासोबतच तुम्हाला कामानिमित्त जास्त प्रवास करावा लागणार आहे. 


कन्या रास (Virgo Zodiac)   


या राशीच्या सातव्या घरात अंगारक योग निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे गरजेच आहे. मित्रांमुळे काही समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. यासोबतच आयुष्यात या ना त्या कारणाने अनेक समस्या निर्माण होणार आहेत. तुमचा अहंकार झपाट्याने वाढणार असल्याने ज्यामुळे तुमच्या नात्यात कडुता येण्याची शक्यता आहे. नात्यात विभक्त होण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.


धनु रास (Sagittarius Zodiac) 


या राशीच्या चौथ्या घरात अंगारक योग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत राहू या राशीच्या लोकांच्या सुखसोयी आणि ऐषोआराम घट करणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आरोग्याबाबत थोडेही बेफिकीर दाखवू नका. घरगुती जीवनातही काही बदल दिसून येणार आहेत. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. कारण तुमच्या कामात कोणी ढवळाढवळ केलेली तुम्हाला आवडणार नाही. यासोबतच कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होणार आहे. यासोबतच गाडी चालवताना थोडी सावधगिरी बाळगणं गरजेच आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)