Shani Vakri 2023 Dates : ज्याच्यावर शनिची कृपा असेल त्याला मोठे यश मिळणार आहे. तसेच आर्थिक लाभही होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. अडीच वर्षात शनी राशी बदलतो. 30 वर्षांनंतर शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. शनी सध्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत असून आता 17 जूनपासून शनी पूर्वगोचर होणार आहे. शनीच्या पूर्वगोचर गतीचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. यासोबतच काही लोकांसाठी ते खूप शुभ असेल. या लोकांना शनी धन देखील देईल, तसेच नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल.  


शनी या लोकांचे भाग्य उजळवेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : शनीची मेष राशीच्या लोकांवर कृपा असणार आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना खूप लाभ होणार आहे. हे लोक त्यांच्या करिअरमध्ये मोठी प्रगती करु शकतात. नोकरीत बदल होऊ शकतो. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्न वाढेल. अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. परदेश दौऱ्यावर जाण्याचा योग असणार आहे.


वृषभ : शनी कुंभ राशीत प्रवेश केल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी वरदान ठरेल. नोकरीत मोठे पद मिळेल आणि तुमच्या करिअरमध्ये चांगली तेजी येईल, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. बॉसचे सहकार्य मिळेल. पगारात मोठी वाढ होऊ शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल तसेच तुम्हाला मानसन्मान मिळेल. 


मिथुन : वक्र शनी मिथुन राशीच्या लोकांना छप्पड फाड कमाई करुन देणार आहे. त्यामुळे तुमच्या हातात भरपूर पैसा येईल. प्रलंबित पदोन्नती-वाढ लवकरच प्राप्त होईल. धनलाभ होईल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल आहे. व्यवसायात वाढ होईल. मोठा फायदा होईल. कोठे गुंतवणूक केल्यास त्याचा निश्चित फायदा होणार आहे. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे. 


धनु : धनु राशींच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे. शनीची वक्र चाल धनु राशीच्या लोकांचे भाग्य उजळवेल. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या आता संपणार आहेत. नोकरी-व्यवसायासाठी लाभदायक काळ राहील. पैसा मिळेल उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ. घरामध्ये कोणतेही मांगल्य किंवा शुभ कार्य होऊ शकते. त्यामुळे घरात आनंद असेल.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)