Vinayak Chaturthi 2023 : हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाला सुरुवात झाली आहे. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता गणेशाची आराधना करण्यासाठी विनायक चतुर्थी आणि संकष्टी हा दिवस साजरा केला जातो. पंचांगानुसार तिथीला पाहून तो दिवस साजरा केला जातो. त्यामुळे अनेक भक्तांना प्रश्न पडला आहे की, आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे. चला आज आपण तिथी आणि मुहूर्त, पुजेबद्दल जाणून घेऊयात. 


विनायक चतुर्थी तारीख 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी 21 जून 2023 ला दुपारी 03:09 ला सुरु झाली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 22 जून 2023 ला संध्याकाळी 05:27 मिनिटांनी समाप्त होईल. विनायक चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानला जातो. (ashadha vinayak chaturthi 2023 date muhurat puja 22 june Vinayak Chaturthi totke)


गणेश पूजेची वेळ - सकाळी 10.59 ते दुपारी 13.47
चंद्रोदयाची वेळ - सकाळी 08.46 (विनायक चतुर्थीच्या सकाळी चंद्र उगवतो)


पूजा विधी


सकाळी लवकर उठून आंघोळ करा.


गंगेचे पाणी शिंपडून घर स्वच्छ करा आणि जागा शुद्ध करा.


आता व्रताचा संकल्प घ्या.


सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करून पिवळी फुलं, पिवळी फळं, दिवा, धूप, चंदन आणि उदबत्तीने गणेशाची पूजा करा.


बाप्पाला मोदक प्रिय आहेत, त्यामुळे मोदक अर्पण करा.


विनायक चतुर्थी व्रताचे फायदे 


या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न केलं जातं. सतत जीवनात वाईट प्रसंग किंवा जीवनात अपयश येतं असेल त्या जाचकांनी हे व्रत करावे. यादिवशी त्या लोकांनी मोदक, लाडू, पिवळे वस्त्र, मिठाईचं दान करावं. शिवाय  बुध आणि राहू-केतूच्या त्रासापासून आराम मिळतो. 


विनायक चतुर्थीला या मंत्र्यांचा जाप करा!


वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥


गजाननं भूतगणाधिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्।
उमासुतं शोकविनाशकारकम्न, मामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्॥


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)