Navratri Ashtami Date 2024 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी आणि नवमी एकत्र? कन्या पूजा कधी? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या
Navratri Ashtami and Navami Date : नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व आहे. यादिवशी कन्या पूजन आणि देवीला कुंकुमार्चन करण्यात येतं. यंदा अष्टमी आणि नवमी तिथीबद्दल भक्तांमध्ये संभ्रम आहे.
Navratri Ashtami and Navami in Marathi : शारदीय नवरात्री सुरु असून यातील अष्टमी आणि नवमी तिथीला अतिशय महत्त्व आहे. या दोन तिथीला कन्यापूजन, होम हवन आणि कुंकुमार्चन इत्यादी विधी करण्यात येतात. अनेक जण नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी तिथीला व्रत करतात. अशात यंदा अष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आली आहे का? कन्या पूजा कधी करायची याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. (Ashtami and Navami Date together in Navratri Know Tithi auspicious time and Kanya Pujan)
अष्टमी आणि नवमी कधी? (Navratri Ashtami Date 2024)
पंचांगानुसार, यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये (Shardiya Navratri 2024) चतुर्थी तिथीमध्ये वाढ झाल्यामुळे नवमी तिथी कमी वेळ असणार आहे. पंचांगानुसार यावेळी सप्तमी आणि अष्टमी तिथी दोन्ही एकाच दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरला असून शास्त्रानुसार सप्तमी आणि अष्टमी एकाच दिवशी व्रत करणे शुभ मानले जात नाहीय. अशा परिस्थितीत महाअष्टमी आणि महानवमी एकाच दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबरला साजरी करायची आहे.
अष्टमीच्या दिवशी करा माता गौरीच्या या मंत्राचा जप (Ashtami Devi Mantra)
या देवी सर्वभूतेषु माँ गौरी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥
सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥
हेसुद्धा वाचा - Kunkumarchan Navratri 2024: देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? नवरात्रीत कोणत्या दिवशी करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती
अष्टमीच्या महापूजेचे महत्त्व (Importace of Ashtami Mahapuja)
नवरात्रीचा आठवा दिवस हा महाअष्टमी म्हणून ओळखला जातो. या तिथीला विशेष महत्त्व असून 11 ऑक्टोबरला साजरा होणार आहे अष्टमीला माता गौरीची विधीवत पूजा केल्याने निपुत्रिक जोडप्यांना पुण्यवान आणि निरोगी संतती प्राप्त होते, अशी मान्यता आहे. याशिवाय घरात सुख, समृद्धी आणि समृद्धी टिकून राहते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्या पूजा केल्याने देवी मातेची विशेष कृपा होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा भक्तांचा विश्वास आहे.
अष्टमी पूजा विधी (Mahaashtami Puja Vidhi 2024)
यंदा महाअष्टमी आणि महानवमी एकाच दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे. अशा स्थितीत या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. यानंतर पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. यानंतर देवी समोर दिवा लावा आणि माता दुर्गाला गंगाजलाने अभिषेक करा. पूजेदरम्यान देवीला अक्षत, लाल सिंदूर, फुले आणि प्रसाद अर्पण करा. खीर, हरभरा आणि पुरीसारखे सात्विक अन्न देवी दुर्गाला प्रसाद म्हणून अर्पण केले जाऊ शकते. धूप आणि दिवे प्रज्वलित केल्यानंतर दुर्गा चालिसा पाठ करा आणि शेवटी कुटुंबासह मातेची आरती करा.
हेसुद्धा वाचा - Kanya Pujan Navratri 2024 : 10 की 11 ऑक्टोबर कधी आहे कन्यापूजन? जाणून घ्या तिथीपासून शुभ मुहूर्त आणि महत्त्व
अशी करा कन्या पूजन (Kanya Pujan)
महाष्टमी आणि महानवमी (नवरात्री 2024) या दिवशी कन्या पूजेचे विशेष महत्त्व मानलं जातं. अशा परिस्थितीत या तिथीला पूजेनंतर 8 किंवा 9 मुलींना आपल्या घरी जेवायला बोलवा. त्यांना यथाशक्ती पकवान्न तयार करून जेवायला द्या. त्यांना हळदी कुंकू लावा. त्यांचे पाय धूवून ते कापडाने पूसा. निरोप घेण्यापूर्वी, त्यांना काही भेटवस्तू द्या आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांना निरोप द्या. असे केल्याने देवी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला सुख-समृद्धीचे आशीर्वाद देते, असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)