Kunkumarchan in Marathi : सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाथ् साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
शारदीय नवरात्री सुरु असून नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंकुमार्चन विधी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. 12 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा आहे. यादिवशी दुर्गा देवीच विसर्जन करण्यात येतं. अशात यंदा तुम्ही पण कुंकुमार्चन विधी करण्याचा विचार करत असाल तर संपूर्ण माहिती जाणून घ्या. (What is Kunkumarchan to Goddess lakshmi Know the complete information on which day Kunkumarchan on Navratri )
हिंदू धर्मानुसार कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती, लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्रावर करतो येता. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करुनच मग कुंकुमार्चन पूजा करण्यात यावी. तर महिलांसोबत पुरुषही कुंकुमार्चन विधी करु शकतात.
कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, अशी मान्यता आहे. म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते, असं म्हटलं जातं. जागृत मूर्तीतील शक्ती तत्त्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते, अशी समजूत आहे. मूळ कार्यरत शक्ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालीय.
कुंकुमार्चन करुन अर्पण केलेले साठलेले कुंकु एका डबीत भरून ठेवावे. कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू, देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटावं. हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळावर लावावे.
कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट ) पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे. त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताच अंगठा ,मधले बोट आणि करंगळी ह्या बोटांनी कुंकु घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत वहावे किंवा कुंकवाने अभिषेक करावा. हे कुंकू कोरडे असावे.
ताह्मणामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी. पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे. देवीचे आवाहन करून पूजन सूरू करावे. लाल रंगाचे फूल वहावे. धूपदिप लावावा. देवीचे नाम जपत चिमूटभर कुंकू वाहावे. कुंकू वाहुन झाल्यावर देवीची आरती करावी. दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे. वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाळावर लावावे.
अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन
मंगळवार ,शुक्रवार, पौर्णिमा, गुरु पुष्यामृत योग या दिवशी करता येतं.
तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्यादिवशी
अमावस्येला कुंकुमार्चन करु नये.
शारदीय नवरात्रीत कधी करावं कुंकुमार्चन विधी?
शारदीय नवरात्रीत अश्विनी शुक्ल अष्टमी तिथीला कुंकुमार्चन विधी करण्यात येणार आहे. अष्टमी तिथी गुरुवारी 10 ऑक्टोबरला कुंकुमार्चन करायचं आहे. आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्या पूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं असे केल्यास ते खूप पुण्यकारक आणि शुभफलदायी आहे.
देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन पूजा म्हटली जाते. देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र, श्री सुक्त, देवी स्तुती किंवा नवार्ण मंत्र हे मंत्र म्हणत कुंकुमार्चन करावे.
या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता,
नमः तस्यै, नमः तस्यै, नमः तस्यै, नमो नमः
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)