Astro Tips: व्यक्तीने `या` 4 गोष्टी उधार घेणं टाळावं, विपरीत परिणाम होण्याची शक्यता
चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या उधारीवर घेऊ नयेत.
Astro Tips: काहींना उधारीच्या जीवावर जगायला आवडतं. मात्र तुम्हाला माहिती आहे का, अशा काही गोष्टी आहेत ज्या, उधारीवर कधीही मागू नये. अशामुळे उधार घेणाऱ्या व्यक्तीला नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये वास्तू दोष लागू शकतो शिवाय अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असते.
चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या उधारीवर घेऊ नयेत.
पेन्सिल किंवा पुस्तक
सामान्यपणे व्यक्ती पेन्सिल कोणाकडून तरी मागून घेतो. मात्र ही सवय फार चुकीची आहे. जोतिष्य शास्त्रानुसार, कोणाचंही पेन किंवा पेन्सिल वापरणं शुभं नाही. पेन आणि पुस्तकाचा संबंध बुध ग्रहाशी असतो. त्यामुळे वाचण्यासाठी कधीही कोणाचं पुस्तक कधी वाचण्यासाठी घेऊ नये.
दागिने
आयुष्यात एखादी व्यक्ती कोणाचे दागिने उधार घेऊन घालते तर ते योग्य नाही. अनेकदा महिलांकडून असं केलं जातं. ज्योतिषशास्त्रात, हे अशुभ मानलं जातं. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये याचा संबंध शुक्र ग्रहाशी मानला जातो. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीकडून दागिने घेणं टाळलं पाहिजे.
कपडे
ज्योतिष शास्त्रानुसार दुसऱ्याचे कपडे कधीही वापरू नये. असं केल्यास तुमच्या आयुष्यात दारिद्र येण्याची शक्यता आहे. तसंच ज्योतिष शास्त्रानुसार, जुने कपडे वापरल्याने केल्याने नशिबाची साथ मिळत नाही.
लग्नासाठी पैसे
लग्नासाठी लोक अनेकदा पैसे इतरांकडून उधार घेतले जातात. मात्र हे चुकीचं आहे. असं केल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता असते. वैवाहिक जीवनाचा संबंध शुक्र आणि गुरूसोबत मानण्यात येतो. त्यामुळे पैसे उधार घेतल्यास ग्रहांचा कोप होऊ शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)