Astro Tips : कपाळात कुंकू भरताना `या` चुका करणं टाळा, नाहीतर...!
कपाळाला सिंदूर भरण्यासाठी काही विशेष नियम देखील आहेत, जे आपण कोणत्याही परिस्थितीत पाळले पाहिजेत.
मुंबई : सनातन धर्मात एकूण 16 संस्कारांचे वर्णन केलंय. यापैकी एक म्हणजे विवाह सोहळा. सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सिंदूर भरतात. विवाहित महिलांसाठी हे खूप शुभ मानलं जातं. कपाळाला सिंदूर भरण्यासाठी काही विशेष नियम देखील आहेत, जे आपण कोणत्याही परिस्थितीत पाळले पाहिजेत. असं न केल्यास अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. ते नियम काय आहेत ते जाणून घेऊया.
विवाहित महिलांनी कपाळामध्ये कुंकू भरताना लक्ष द्यावं की, ते नेहमी कपाळाच्या मध्यभागी लावावं. असे केल्याने पतीचे आयुष्य दीर्घायुषी होतं असं मानलं जातं. कपाळाच्या आजूबाजूला कुंकू भरल्याने ते अशुभ मानलं जातं.
हिंदू शास्त्राप्रमाणे, विवाहित महिलांनी खरेदी केलेलं कुंकू कपाळाला लावावं. दुसऱ्याच्या पैशातून कुंकू विकत घेणं किंवा कपाळात भरणं अशुभ मानलं जातं. यामुळे कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळू शकतो.
केस कोरडे करा
कपाळात सिंदूर भरण्यापूर्वी केस नेहमी सुके असले पाहिजे. ओल्या केसांमध्ये सिंदूर भरल्याने पसरून डोकेदुखी होऊ शकते. यासोबतच कुटुंबात आर्थिक संकटही निर्माण होऊ शकतं. अशाने केल्याने मनात नकारात्मक विचारही येऊ शकतात, असं मानलं जातं. त्यामुळे केस सुकल्यानंतर नेहमी कुंकू लावावा.
केसांनी कुंकू सिंदूर लपवण्याचा प्रयत्न करू नका
कपाळात कुंकू भरल्यानंतर अनेक महिला ते लपवण्याचा प्रयत्न करतात. हिंदू धर्मग्रंथानुसार, कपाळात कुंकू भरणं हे पती-पत्नीमधील प्रेमाचं प्रतीक आहे. त्यामुळे ते कधीही लपवता कामा नये. असं केल्याने परस्पर संबंधात दुरावा येऊ शकतो.