Banana Tree Remedies On Thursday :  अनेकांना आर्थिक समस्या असते. काहींचा खिशात पैसा राहतं नाही, तर काही लोकांचे पैसे अडकून असतात. तर काही लोकांना कितीही मेहनत केली तरी पैसे येतं नाही. या आर्थिक संकटामुळे आयुष्याची घडी बिघडते. अशात अनेक जण यावर उपाय शोधण्यासाठी ज्योतिषशास्त्र किंवा वास्तूशास्त्राची मदत घेतात. जर तु्मच्याही खिशात पैसा राहतं नसेल तर काय करायचं, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मार्गशीर्ष महिन्याचा आजचा शेवटचा गुरुवार.... या वर्षातील शेवटची अमावस्या आज संध्याकाळी सात नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे महिलांनी सातच्या आत पूजा करुन मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करुन घ्यावं. पण याशिवाय गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही लक्ष्मीला खूश करण्यासाठी हे उपाय केल्यास तुम्हाला लाभ होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. वृक्ष आणि वनस्पतींमध्ये देवी-देवता वास असतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे जर या वृक्षाची विशेष दिवशी पूजा केल्यास तुम्हाला याचा लाभ होऊ शकतो.  गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांना समर्पित आहे. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करून उपाय वगैरे केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.


ज्योतिष शास्त्रानुसार केळीच्या झाडाशी संबंधित काही उपाय गुरुवारी केल्यास त्या व्यक्तीवरील आर्थिक संकट नाहीस होतं अशी मान्यता आहे. तसंच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. माता लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी असल्याचं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी हा उपाय केल्यास माता लक्ष्मीही प्रसन्न होते. चला जाणून घेऊया गुरुवारी केळीच्या झाडाशी संबंधित काही खास उपाय. (Astro Tips for Thursday and thursday upay for money Banana Tree Remedies On Thursday)


केळीच्या झाडाशी संबंधित 'हे' उपाय गुरुवारी करा


- ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये केळीचे झाड लावल्यास त्या घरात कधीही दुःख आणि दारिद्र्य येत नाही.


-  गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीची आर्थिक संकटातून सुटका होते. या शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.


- घरात सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य हवं असेल तर केळीच्या झाडाची मुळं खूप फायदेशीर आहे, असं मानलं जातं. प्रथम गंगाजलाने मुळ धुवावे आणि मुळावर पिवळ्या रंगाचा धागा बांधावा. यानंतर ज्या ठिकाणी पैसा ठेवला आहे किंवा तिजोरीमध्ये हे मूळ ठेवा. हा उपाय गुरुवारी करावा. 


- गुरुवारी आंघोळीनंतर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून पिवळ्या रंगाच्या कपड्याने डोके झाकून केळीच्या झाडाजवळ जाऊन हात जोडून इच्छा व्यक्त करा, असं केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.