मुंबई : Why Nails Should not cut at Night: हिंदू धर्म, वास्तु शास्त्र, ज्‍योतिष शास्‍त्र यांमध्ये बरीच कामं करण्यापासून विरोध करण्यात आला आहे. तर, काही कामं अमुक एका वेळीच करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मान्यतांनुसार या कामांचे परिणाम शुभ आणि अशुभ स्वरुपात होत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशाच कामांपैकी एक म्हणजे नखं कापणं. तुम्ही जर तिन्ही सांजेच्या वेळी नखं कापण्यास सुरुवात केली किंवा साथं नेलकटर हातात जरी घेतलं तरी घरातली मोठी माणसं रागे भरताना दिसतात. 


रात्रीच्या वेळी नखं कापल्यामुळं दारिद्र्य मागे लागतं, असं त्यांचं म्हणणं. पण, कधी यामागचं वैज्ञानिक कारण काय असेल? हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? 


काय आहे वैज्ञानिक कारण ? 
आधीच्या काळात जेव्हा वीजपुरवठा सुरळीत नव्हता तेव्हा रात्रीच्या वेळी नखं कापण्यापासून थांबवण्यात येत होतं. रात्रीच्या वेळी नखं कापताना इजा पोहोचू नये, यासाठीच हा नियम होता. 


खरंच दारिद्र्य मागे लागतं? 
धर्म, ज्‍योतिष आणि वास्‍तु शास्‍त्राच्या नियमांनुसार रात्रीच्या वेळी नखं कापल्यास लक्ष्मी नाराज होते असं म्हटलं जातं. परिणामी घरात दारिद्र्य येतं. रात्रीच्या वेळी नखं कापल्यास व्यक्तीला आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं, त्याच्यावर कर्जाचा बोझा वाढतो असं म्हणतात. 


खरं कारण असं, की संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी घरात येते असं म्हटलं जातं. त्यासाठीच शास्त्रांमध्ये लिहिल्यानुसार लक्ष्मी घरात येण्यापूर्वी सर्व स्वच्छतेची कामं पूर्ण करून घ्यावीत. 


लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी म्हणून तिन्ही सांजा होण्याआधीच घरात स्वच्छतेची कामं पूर्ण करुन घ्या. रोज सायंकाळी देवाची आराधना करा. घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावा, देवाची पूजाअर्चा करून घरातलं वातावरण सकारात्मक ठेवा. असं केल्यास लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात शांतता आणि सुख- समृद्धी नांदते.