Astrology 2022 Shukra Chandra Yuti: ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांचं अनोखं नातं आहे. प्रत्येक ग्रह त्याच्या स्वभावानुसार फळं देत असतो. त्यामुळे कुंडलीतील बारा स्थानात ग्रह कुठे बसले आहेत. यावर त्या त्या व्यक्तीला शुभ अशुभ परिणाम मिळत असतात. जन्माच्या वेळी कुंडलीत असलेले ग्रह आणि ठरावीक कालावधीनंतर ग्रहांचे गोचर परिणामकारक ठरतात. त्यामुळे ग्रहांच्या गोचरानुसार शुभ अशुभ परिणाम ठरवले जातात. प्रत्येक ग्रहांचा गोचर कालावधी हा ठरलेला आहे. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी, तर शनि मंद गतीने अडीच वर्षांनी राशी बदल करतो. कधी कधी गोचर कालावधीत एकापेक्षा अधिक ग्रह एका राशीत येतात. त्यामुळे काही शुभ अशुभ योग तयार होतात. आता 24 तासानंतर म्हणजेच 24 ऑगस्ट 2022 रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्र ग्रह आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे कर्क राशीत चंद्र-शुक्र युती होणार आहे. या युतीमुळे तीन राशींना चांगला लाभ मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष - मेष राशीच्या लोकांना या युतीचा विशेष लाभ मिळू शकतो. या राशीतील चतुर्थ स्थानात युती होत आहे. या स्थानाला केंद्र स्थान म्हटलं जातं. यामुळे मेष राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल. या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. कला क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. या युतीमुळे परदेशात उद्योग असलेल्या व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल.


कर्क - या राशीच्या कुंडलीत लग्न स्थानात हा योग तयार होत आहे. या काळात जोडीदाराशी संबंध सुधारतील. प्रेमसंबंधात यश मिळेल. त्याचबरोबर व्यवसायासाठीही हा काळ शुभ राहणार आहे. या काळात नवीन ऑर्डर मिळू शकतात. सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे. 


कन्या - शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे चांगले दिवस सुरू होतील. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतील अकराव्या स्थानात युती होत आहे. या स्थानाला उत्पन्न आणि नफ्याचे स्थान मानले जाते. या काळात मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)