मेष - अर्थार्जनाच्या नव्या वाटा मिळतील. अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्या. एखादी प्रवास योजना आखू शकता. ओघाओघात वाहत जाऊ नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका. 


मिथुन- करिअरच्या वाटा यश घेऊनच येतील. नोकरीची संधी मिळेल. अविवाहितांसाठी स्थळं येतील. वरिष्ठांचा सल्ला आयुष्यभराची मदत करेल. 


कर्क- तुमच्या प्रयत्नांना आज यश मिळणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. नवं काम हाती येणार आहे. 


सिंह - मंगळ असणाऱ्यांसाठी आज शुभ योग आहे. चांगले मित्र, कुटुंब, आनंद सर्वकाही तुमच्याच कलानं असणार आहे. 


कन्या- काही गोष्टी तुमच्या विरोधात जातील, त्या ओळखा. दुर्लक्ष करु नका. कुटुंबात सुखसंपदा नांदेल. मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांचं सहकार्य मिळेल. 


तुळ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. बोलण्यावर ताबा ठेवा. 


वृश्चिक- आर्थिक प्रगतीची संधी आहे. तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधी ओळखा आणि त्या संधीचं सोनं करा. परिस्थिती तुमच्याच नियंत्रणात आहे म्हणून हुरळून जाऊ नका. 


धनु- विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. देण्यात आलेले लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अप्रत्यक्ष गोष्टींना फार महत्त्वं देऊ नका. 


मकर- भाग्योदयाचा काळ नजीक आहे. यशशिखरावर पोहोचण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. 


कुंभ- सहनशीलता आज तुम्हाला मदत करणार आहे. मित्रांची मदत होणार आहे. धनलाभ होणार आहे. 


मीन- आज तुमच्या नेतृत्त्वंक्षमतेची परीक्षा आहे. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे आभार माना.