राशीभविष्य | `या` राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- मेहनतीचं फळ मिळेल. धीर राखा, काळजी घ्या. ग्रह- तारे तुमच्या यशास कारणीभूत ठरतील. जमीन किंवा नव्या घरासंबंधीचे व्यवहार पूर्ण होतील. प्रत्येक मार्गाने तुम्हाला सहकार्य मिळेल.
वृषभ- आजचा दिवस रचनात्मक आहे. जे काही करु इच्छिता त्यामध्ये इतरांचं सहकार्य मिळेल. नव्या व्यक्ती, नवे विचार तुमच्या समोर येतील. मित्रपरिवारासोबतचे संबंध चांगले असतील. जुने वाद मिटतील. मित्रांशी चांगले संबंध जुळतील. नव्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.
मिथुन- मनातच काही बेत आखले असाल, तर त्यात काही बदल करावे लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला उद्देशून जे काही सांगण्यात येईल त्याकडे लक्ष द्या. विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींकडे आकर्षित व्हाल. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल.
कर्क- आजचा दिवस बऱ्याच आशा- आकांक्षांचा आहे. व्यापार, अर्थव्यवहार या साऱ्याशी निगडीत काही बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. नव्या मित्रांची भेट घडेल. नकळतपणे तुम्ही बरेच सक्रिय असाल ज्यातूनच तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी शिकाल. आत्मविश्वासाने ज्या गोष्टी कराल त्यात हमखास यश मिळेल. दैनंदिन कामं मार्गी लावा.
सिंह- जी कामं कराल ती पूर्ण विचार करुनच करा. संधीच्या शोधात राहा. तुम्ही आखलेले बेत पूर्ण होतील. इतरांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकाल. बऱ्याच काळापासून सुरू असणाऱ्या अडचणी दूर होतील.
कन्या- सुस्ती झटका, उदास राहू नका. नवे मित्र जोडण्याचा प्रयत्न करा. पुढे जाण्याच्या काही संधी मिळतील. तुमच्या अनेक अपेक्षा येत्या काळात पूर्ण होतील. कोणत्याची अडचणीच्या प्रसंगी डगमगू नका. अडचणी वाढतील. अधिक अडचणी असतीचलच तर इतरांचा सल्ला घ्या. शांत चित्ताने विचार करा.
तुळ- एखादी मोठी जबाबदारी मिळेल. मेहनत करा, फळ मिळेल. इतरांचं लक्ष वेधण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवून आणाल जे पुढे जाऊन तुमच्या करिअरच्याच दृष्टीने फायद्याचे ठरतील. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील.
वृश्चिक- अनेक कामं पूर्णत्वास जातील. बेत आखाल तर यश्वी व्हाल. आज तुम्ही प्रसन्न असाल. भावनात्मक पातळीवर संतुलित राहाल. आर्थिक स्तिती सुधारेल. अनेक अडचणींवर तोडगा निघेल. अडकलेले पैसे परत मिळतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
धनु- मित्र किंवा एखाद्या सहकाऱ्यासोबत अर्थार्जनाची संधी आहे. इतरांप्रती असणाऱ्या भावनेमुळे यश मिळेल. साथीदाराविषयी चिंतातूर असाल तर त्या चिंता दूर होतील. जुन्या कामांचे चांगले परिणाम आता दिसू लागतील.
मकर- एकाच वेळी अनेक बेत आखाल. स्वत:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा, यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही बाबतीत नवी सुरुवात करण्याची संधी मिळेल. काही निर्णय स्वत:च्याच विचारांनी घ्याल. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत होईल.
कुंभ- आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल. चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहाल. साथीदाराकडूनही आनंद मिळेल. दिवस व्यग्र असेल. याचा फायदाही होईल. दिवसाचं प्लानिंग करा. जुन्या वाईट गोष्टी विसरुन पुढे जाण्यातच फायदा आहे.
मीन-आर्थिक गुंतवणूकीसाठी चांगल्या योजना समोर येतील. काही गोष्टी तुमच्याच पक्षात असतील. दिवसभर तुम्ही बरेच व्यग्र असाल. जवळच्या व्यक्तीविषयी शुभवार्ता कळेल. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल करण्याचा विचार कराल. अधिकाधिक कामं पूर्णत्वास जातील.