Astrology, Zodiac Sign : आपण अनेकवेळा पाहिलं असेल की काही महिलांचं त्यांच्या रागावर नियंत्रण राहत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. संबंधित ग्रहाचा प्रभाव त्या व्यक्तीवर असलेला दिसून येतो. कोणत्याही व्यक्तीची रास आणि नाव हे त्याच्या जन्मवेळ, तारीख, ठिकाण आणि वेळ अवलंबून असते. काही ग्रह उग्र स्वभावाचे असतात त्यामुळे त्या राशीच्या लोकांचा स्वभाव त्या ग्रहाच्या स्वभावात दिसतो. अशा राशीच्या महिलांबद्दल जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मकर - या राशीचा अधिपती ग्रह शनि आहे. जरी या राशीच्या महिलांना लगेच राग येत नाही, परंतु जेव्हा येतो तेव्हा त्यांना आजूबाजूचे काहीही दिसत नाही आणि फक्त रागवलेल्या दिसतात. मात्र नंतर त्यांना अनेकदा पश्चातापही करावा लागतो. या राशीच्या मुलींवर शनि ग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.


कर्क - ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे अधिपती ग्रह चंद्र आणि मंगळ असून मंगळ हा क्रूर ग्रह मानला जातो. अशा स्थितीत या मुलींनाही रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि लगेच व्यक्तही होत नाही. कधीकधी त्यांच्या रागाचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. पण तरीही तिला तिच्या बोलण्यावर ताबा ठेवता येत नाही. 


कुंभ - या राशीचा अधिपती ग्रहदेखील शनिदेव आहे. त्यामुळे या राशीच्या मुलींचा रागही खूप असतो. अनेक वेळा हे लोक रागामुळे स्वतःचे नुकसान करतात. इतकेच नाही तर कधी कधी त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळे येतात. रागाच्या तीव्रतेमुळे ते मानसिक तणावाखाली राहतात आणि स्वतःचा जीव संकटात टाकतात.


मेष - ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीचा शासक ग्रह मंगळ आहे. अशा स्थितीत या लोकांवर या ग्रहाचा प्रभाव दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा अग्निमय ग्रह आहे. यामुळे या राशीच्या मुलींचा स्वभाव रागीट असतो. कोणत्याही परिस्थितीत या मुलींना आपला राग आवरता येत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरही होतो.


 (Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)