मेष- पैसा गुंतवण्यासाठी योग्य वेळ. आजचा दिवस खूप धावपळीचा असेल. मात्र, कामं ठरल्यानुसार पार पडतील. प्रिय व्यक्तींबद्दल सुवार्ता ऐकायला मिळू शकतात. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचा विचार करा. लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- आज तुमच्या मनात अनेक योजना असतील. वेळेचे योग्य नियोजन केले तर यशस्वी व्हाल. पैसे कमावण्याचा विचार करार. आजचा दिवस चांगल्या लोकांसोबत घालवाल. एखादी नवीन गोष्ट करण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्या. रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. योग्य सहकार्य मिळेल. दिवस धावपळीचा असला तरी फलदायी ठरेल.


मिथुन - पैसा गुंतवण्यासाठी उत्तम दिवस. मनाचा आवाज ऐकून अनेक निर्णय घ्याल. हे निर्णय यशस्वीही ठरतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.


कर्क- व्यवसाय, पैसा आणि कायदेशीर प्रकरणे मार्गी लावण्यासाठी उत्तम दिवस. नवे मित्र भेटतील, नव्या गोष्टी शिकाल. कामात आत्मविश्वास असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.


सिंह- कामाचे काटेकोर नियोजन करा. स्वत:च्या बुद्धीची छाप इतरांवर पाडाल. अनेक काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. 


कन्या- आळस आणि नैराश्य झटकून प्रयत्न कराल तर यशस्वी ठराल. नोकरी किंवा धंद्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. एखादा अडथळा आल्यास घाबरून जाऊ नका. ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि शांतपणे मार्ग काढा. यश नक्कीच पदरात पडेल.


तूळ- नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता. सकारात्मक विचार कराल. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या लोकांची भेट होण्याची शक्यता.


वृश्चिक- कामं ठरवल्यानुसार पार पडतील. बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत असलेली संधी मिळेल. आर्थिक आवक वाढल्यामुळे भावनिकदृष्ट्या संतुलित राहाल. 


धनु- एखादा मित्र किंवा मैत्रिणीसोबत भागीदारी करून पैसा मिळेल. जोडीदार किंवा कुटुंबीयांविषयी असलेल्या चिंता दूर होण्याची शक्यता. 


मकर- नियोजित गोष्टींमध्ये काही बदल करावे लागतील. इतरांनी सांगितलेल्या गोष्टी बारकाईने ऐका, आपणे म्हणजे इतरांना नीट समाजावून सांगा. नव्या भेटीगाठी होतील. एखादी व्यक्ती आकर्षित होण्याची शक्यता.


कुंभ- नियोजित गोष्टी अचूकपणे पार पडतील. बऱ्याच काळापासून असलेली एखादी अडचण सुटेल. मित्रांशी संबंध सुधारतील. नव्या लोकांना भेटाल.


मीन- निश्चयाने काम केल्यास मेहनत सार्थकी लागेल. घरात काही अनपेक्षित घटना घडतील. तुमच्या डोक्यात एकाचवेळी अनेक योजना असतील. कुरघोडी करायचा प्रयत्न झाल्यास शांत राहून निर्णय घ्या. घर आणि जमीनजुमल्याच्या व्यवहारात यश मिळेल.