Astro Tips For Nails Cut: नखं वाढली की आरोग्याच्या दृष्टीकोनातून कापणं गरजेचं आहे. कारण नखात घाण जमा होते आणि जेवणाचे घास घेताना पोटात जाते. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नखांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टींसाठी एक शास्त्र सांगितलं आहे. नखं कापण्याबाबतही शास्त्रात नियम आहेत. कोणती वस्तू कुठे असावी यापासून ते कोणत्या दिवशी काय करावं याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. घरातील वडीलधारी माणसं कायम नखं कापण्यापूर्वी आपल्याला आडकाठी करत असतात. मात्र त्याचं नेमकं कारण कधी कधी त्यांनाही माहिती नसते. अनेकदा त्यांच्याकडे परपंरागत ही माहिती आलेली असते. गुरुवार, शनिवार आणि मंगळवारी नखं कापू नये असे ते कायम सांगतात. त्याचबरोबर रात्रीची नखं कापण्यास वडिलधारी माणसं मज्जाव करतात. असं केल्यास देवी लक्ष्मी नाराज होते असं सांगितलं जातं. घरात आर्थिक अडचण येते असं देखील सांगितात. मग नखं कापण्यासाठी योग्य दिवस आणि वेळ कोणती? जाणून घेऊयात...


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सोमवार- हा दिवस भगवान शंकर, चंद्र या ग्रहाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी नखं कापल्याने तमोगुणातून सुटका होते. 

  • मंगळवार- मारुतिरायाची या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. या दिवशी नखं कापण्यास वर्जित असतं. पण या दिवशी नखं कापल्यास कर्जातून सुटका होते.

  • बुधवार-हा दिवस गणपती बाप्पांचा असून नवग्रहातील बुधाचा निगडीत आहे. या दिवशी नखं कापल्याने अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच नोकरी आणि व्यवसायाचे नवे मार्ग आढळतात.

  • गुरुवार- गुरुवार हा भगवान विष्णु आणि देवगुरु बृहस्पतींशी निगडीत आहे. या दिवशी नखं कापल्याने मनुष्यात सत्व गुणांची वाढ होते.


बातमी वाचा- Astrology: गुरुवारी शंखाशी निगडीत करा हे उपाय, आयुष्यभर राहील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद


  • शुक्रवार- हा दिवस देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाशी निगडीत आहे. हा दिवस नखं कापण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी नखं कापल्याने नात्यात गोडवा निर्माण होतो.

  • शनिवार- हा दिवस न्यायदेवात शनिशी निगडीत आहे. या दिवशी नखं कापू नयेत. यामुळे कुंडलीतील शनि कमकुवत होतो. यामुळे शारीरिक नुकसान आणि धनहानी होऊ शकते. तसेच मानसिक त्रासही सहन करावा लागू शकतो.

  • रविवार-ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी नखं कापू नयेत. कारण यामुळे आत्मविश्वास कमी होतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)