August Grah Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. ग्रह गोचर म्हणजे ग्रह हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. जेव्हा एखाद्या ग्रह आपली स्थिती बदलतो तेव्हा सर्व 12 राशींवर त्यांचा परिणाम होतो. काही जणांसाठी हा परिणाम सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक असतो. प्रत्येक महिन्यात 9 ग्रहांपैकी काही ग्रह आपले स्थान बदलतात. ऑगस्ट महिन्यात चार मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे.  (August 2023 Grah Gochar planet transit in august shukra surya gochar budh vakri effect lucky unlucky zodiac astrology)

 

शुक्र अस्त 2023 (Shukra Ast 2023)


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुख आणि समृद्धीचं प्रतिक शुक्र ग्रह आपली स्थिती बदलणार आहे.  03 ऑगस्टला शुक्र सिंह राशीत संध्याकाळी 07:37 वाजता अस्त होणार आहे. सिंह राशीत शुक्र 16 दिवस स्थिर राहील. यामुळे कन्या, तूळ आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र अस्तामुळे शुभदायक ठरणार आहे. 

 

शुक्र गोचर 2023 (Shukra Gochar 2023)


पंचांगानुसार 07 ऑगस्ट 2023 ला शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र कर्क राशीत 02 ऑक्टोबरपर्यंत या राशीत विराजमान असणार आहे. सध्या शुक्र प्रतिगामी स्थितीत फिरत आहे. अशा स्थितीत शुक्राचं संक्रमण सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करणार आहे. 

सूर्य गोचर 2023 (Surya Gochar 2023)  


येत्या 17 ऑगस्ट 2023 ला दुपारी 01.44 वाजता ग्रहांचा राजा सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहे. सूर्य सिंह राशीत एक महिनाभर राहणार आहे. 

मंगळ गोचर 2023 (Mangal Gohar 2023) 


सूर्य गोचरनंतर 18 ऑगस्ट 2023 ला दुपारी 04.12 वाजता मंगळ कन्या राशीत गोचर करणार आहे. मंगळाच्या राशी बदलामुळे मेष, वृश्चिक राशींना सर्वाधिक भाग्यशाली ठरणार आहे. 

शुक्र उदय 2023


शुक्र ग्रह 19 ऑगस्ट 2023 ला सकाळी 05.22 वाजता उदय होणार आहे. शुक्राच्या वाढीमुळे अनेक राशींना आर्थिक लाभ होईल, तसंच नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. या संक्रमणामुळे मेष, कन्या, वृषभ आणि सिंह लोकांना फायदा होणार आहे. 


बुध वक्री (Budh Vakri 2023)


शुक्र, सूर्य आणि मंगळानंतर बुध 24 ऑगस्टला वक्री होणार आहे. बुध हा बुद्धिमत्तेचा कारक मानला जात. त्यामुळे बुध 24 ऑगस्टला सकाळी 12.52 वाजता सिंह राशीत वक्री होणार आहे. बुधाच्या प्रतिगामी गतीमुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात उलथापालथ होऊ शकते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)