August Grah Gochar : ज्योतिषशास्त्रामध्ये एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहाच्या गोचरचा सर्व राशीच्या लोकांवर चांगला आणि वाईट प्रभाव पडत असतो. ऑगस्टमध्ये अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. काही ग्रह दर महिन्याला राशी बदलतात तर करतात, तर अनेक ग्रह महिन्यातून दोनदा गोचर करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी ऑगस्ट महिन्यात सूर्य, शुक्र आणि मंगळ यासारखे प्रमुख ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या ग्रहांच्या राशी बदलाचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते पाहूया. चला पाहूयात ऑगस्ट महिन्यात कोणते ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. 


ऑगस्ट महिन्यात 'हे' ग्रह करणार गोचर


सूर्य गोचर ( Surya Rashi Parivartan 2023 )


सूर्य देवाला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. सूर्य ( Surya Gochar ) दर महिन्याला त्यांची राशी बदलतात. येत्या 17 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. यावेळी मेष आणि सिंह राशीच्या लोकांना अधिकाधिक फायदे मिळू शकणार आहेत. 


शुक्र गोचर ( Shukra Rashi Parivartan 2023 )


शुक्र ग्रहाला ( Shukra Gochar ) संपत्ती, वैभव, सुख आणि भौतिकवादी मानण्यात येतं. शुक्र 07 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी वृषभ, कन्या आणि तूळ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10.37 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. 


मंगळ गोचर ( Mangal Rashi Parivartan 2023 )


ऑगस्ट महिन्यात मंगळ ग्रह  देखील गोचर ( Mangal Gochar ) करणार आहे. मंगळ 45 दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. 18 ऑगस्ट रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी मेष आणि कन्या राशीच्या लोकांना या काळात प्रत्येक कामात यश मिळणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )