Baba Vanga : बाबा वेंगाची 5 खतरनाक भाकितं... ही येणार मोठी संकटं
Baba Venga Predictions : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत, असे त्यांचे समर्थक सांगतात. 2023 साठी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी असून या खतरनाक आहेत. 2023 या वर्षासाठीही त्यांचे अनेक अंदाज सांगितले आहेत.
Baba Venga Predictions For 2023 : जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्यांपैकी एक बाबा वेंगा हे मानले जातात. त्यांचे निधन होऊन मोठा कालावधी लोटला असला तरी, त्यांच्या भविष्यवाण्यांत अनेकांना मोठी उत्सुकता आहे. (Baba Vanga 2023 Predictions) याचे कारण त्यांच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. आता त्यांच्या पृथ्वीच्या विनाशाशी आणि भयंकर युद्धांशी संबंधित ही भविष्यवाणी आहे. त्यांचे अनेक अंदाज खरे ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. असेही म्हटले जाते की त्यांनी मृत्यूपूर्वी 5079 पर्यंत भविष्यवाणी केली होती. 2023 या वर्षासाठीही त्यांचे अनेक अंदाज सांगितले गेले आहेत.
2023 साठीचे काही भाकीतं
बाबा वेंगा यांनी मोठे युद्ध होण्याचे भाकीत केले आहे. 2023 साठी बाबा वेंगाच्या भविष्यवाणींपैकी एक म्हणजे या वर्षी एक भयानक युद्ध होणार आहे. एवढेच नाही तर एखादा मोठा देश जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात मोठ्या संख्येने लोक मारले जातील, असे बाबा वेंगा यांच्या भाकीतात म्हटलंय.
पृथ्वीला मोठा धोका, हल्ल्याची शक्यता
बाबी वेंगा यांच्या भाकीतापैकी एक म्हणजे पृथ्वीवर हल्ला होण्याची शक्यता आहे. भविष्यवाणीनुसार, या हल्ल्यात पृथ्वीवर खूप विनाश होईल आणि लाखो लोक मारले जातील.
मोठी नैसर्गिक आपत्ती येण्याचा धोका
2023 साठी अनेक नैसर्गिक आपत्तींचे भाकीत बाबा वेंगा यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, यावर्षी पृथ्वीवर एकतर मोठे वादळ येईल किंवा त्सुनामी येईल. सौर वादळ येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. सौर वादळ म्हणजे सूर्यामध्ये होणारा स्फोट ज्याचा धोकादायक विकिरण पृथ्वीवर पडेल.
पृथ्वीवरील लोकांवर होणार परिणाम?
2023 शी संबंधित बाबा वेंगाचे एक भाकीत देखील आहे की, यावर्षी पृथ्वीची कक्षा बदलेल. याचा थेट परिणाम पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील लोकांवर होणार आहे.
अणु प्रकल्पात स्फोट होण्याची शक्यता
तसेच स्फोट होण्याचा धोका आहे. 2023 मध्ये, पॉवर प्लांट किंवा अणु प्रकल्पात स्फोट होऊ शकतो. वेंगाच्या म्हणण्यानुसार, अणुप्रकल्पात स्फोट आशिया खंडात होईल, ज्याचा परिणाम भारतावरही होईल.
( Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही. )